राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम लसीकरणाचा वेग मंदावला; ९९ लाख लाभार्थींचा दुसरा डोस बाकी
मुंबई : राज्यासह मुंबईत कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. तो जास्तीत जास्त वाढवावा, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार ९९ लाख नागरिकांचा दुसरा डोस अद्याप बाकी आहे. पहिला डोस न घेतलेल्यांचा आकडाही मोठा आहे. (Maharashtra COVID-19 Vaccination)
राज्यात ९९ लाख ५९ हजार २६ नागरिकांचा कोव्हिशिल्डचा दुसरा डोस बाकी आहे. १७ लाख ३४ हजार ३७७ लाभार्थींनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतलेला नाही. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाबाबत दिवसेंदिवस कमी होणारी भीती, लशीबाबतचे गैरसमज आणि इतर कारणांमुळे नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ९० टक्क्यांहून नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या फक्त ६० टक्के आहे. १८ वर्षांवरील ८९.४४ टक्के नागरिकांना एक डोस १८ पेक्षा अधिक वयाच्या ८९.४४ टक्के लाभार्थींना एक डोस दिला गेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिल्या गेलेल्यांचे प्रमाण ८३.६४ टक्के आहे. ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिल्या गेलेल्या लाभार्थींचे प्रमाण ८८.९५ टक्के आहे.
पुण्यात दुसऱ्या डोसचे सर्वाधिक शिल्लक लाभार्थी पुण्यात दुसऱ्या डोसचे सर्वाधिक लाभार्थी शिल्लक आहेत. ११ लाख ८ हजार ५७७ पुणेकरांचा कोव्हिशिल्डचा दुसऱ्या डोस शिल्लक आहे. त्यापाठोपाठ नाशिक (७,००,८०३ लाभार्थी), ठाणे (६,८६,२७९), मुंबई (६,३१,२५७), नगर (५,८०,४३२) आणि कोल्हापूर (५,५५,६६९) यांचा क्रमांक लागतो. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी असलेले सर्वाधिक लाभार्थी बुलडाणा (१,५२,१९२) जिल्ह्यातील आहेत. पहिली मात्रा राहिलेले सर्वाधिक ठाण्यात मुंबई वगळता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पहिला डोस न घेतलेले अजूनही सरासरी ५ ते १० लाख नागरिक आहेत. त्यात सर्वाधिक लाभार्थी ठाणे जिल्ह्यात आहेत. भंडारा जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ४,८३३ नागरिकांनी अजूनही लशीचा पहिला डोस घेतलेला नाही.
पहिला डोस राहिलेले लाभार्थी
ठाणे : १०,९९,१५६
नाशिक : ८,५४,९९९
जळगाव : ७,१६,६६६
नगर : ६,७२,६२७
नांदेड : ६,५९,०७२
औरंगाबाद : ५,६०,६२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.