Strike Sakal media
मुंबई

स्विगी रायडर्सची वाशी केंद्रावर धडक; समान वेतनासाठी निदर्शने

CD

घणसोली : वाशीतील स्विगी रायडर कर्मचाऱ्यांनी (Swiggy employee strike ) आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. १९) स्विगी केंद्रावर निदर्शने केली. नवीन कामगारांना जुन्या कामगारांच्या तुलनेने समान वेतन देण्यात यावे, यासाठी ही निदर्शने केली होती. स्विगी फूड डिलिव्हर (Swiggy food delivery) ही मोठ्या कंपन्यांमधील एक संस्था आहे. या संस्थेने कोरोनाकाळात अनेक बेरोजगार तरुणांना (Youth employment) रोजगार दिला आहे. यात जुने व नवीन कामगार समान काम करतात. मात्र, जुन्या कामगारांना तीन किलोमीटरपर्यंत डिलिव्हरी करताना कंपनी ४० रुपये आणि नवीन रायडर्सना २० रुपये देत असल्याने स्विगी कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला. (Swiggy employee strike at vashi center on salary issue)

एक वर्षापासून स्विगीमध्ये काम करत असूनही कंपनी आमच्याशी भेदभाव करत आहे. कंपनीने जुन्या व नवीन कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करू नये. कंपनीने समान कामासाठी समान वेतन द्यावे किंवा किमान हमी पगार द्यावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या कंपनी मान्य करत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आम्ही सकाळी ९ वाजता लॉग इन करून १२ तास काम चालू ठेवतो.

संध्याकाळपर्यंत ५०० ते ६०० रुपये मिळू शकतात. त्यापैकी सुमारे ३०० ते ४०० रुपये खर्च होतात. पेट्रोलचे दर वाढूनही कंपनीने मानधनात वाढ केलेली नाही. त्यामुळे या कामात आवश्यक लाभ मिळत नाही. - राहुल तखत, स्विगी फूड डिलिव्हरी कर्मचारी

या ठिकाणी फक्त नवीन कर्मचाऱ्यांची भरती करतो. त्यांना स्विगीचा गणवेश देतो. विश्रांती देतो. तुमची कोणतीही प्रशासकीय अडचण असेल तर अंधेरीतील केंद्रात जा.

- एच. देहुरकर, वाशी स्विगी केंद्र, अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT