Mumbai train sakal media
मुंबई

मुंबई : मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाद्वारे ''अँटी-स्मोकिंग'' मोहिम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वेमध्ये (Indian railway) प्रवास करताना कोणतीही ज्वलनशील वस्तू (Flammable items) बाळगू नये, धूम्रपान करू नये (No smoking) यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलातर्फे (RPF)) मोहीम राबवण्यात आली. ३० डिसेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ पर्यंत राबवलेल्या या मोहिमेत रेल्वेत आगीच्या घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रवाशांना (Railway commuters) माहिती देण्यात आली. त्यासाठी प्रवाशांना पत्रके वाटणे, स्टिकर्स चिकटविणे, पथनाट्य भरवणे, रेल्वे परिसरात वारंवार उद्घोषणा करणे, जनजागृती बैठका आदी उपक्रम राबवण्यात आले.

तसेच, ३० डिसेंबर २०२१ ते २३ जानेवारी २०२२ दरम्यान रेल्वे प्रवासात धूम्रपान करणाऱ्या ३६ जणांविरोधात मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने (आरपीएफ) कारवाई करत त्यांच्याकडून १९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ६ ते २३ जानेवारी २०२२ पर्यंत आरपीएफने स्थानकांवर ९९१ तपासण्याही केल्या. रेल्वे परिसरात तसेच रेल्वेतून प्रवास करताना धूम्रपान कटाक्षाने टाळावे. धूम्रपान विरोधी मोहीम सातत्याने राबवली जाईल, असे मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

SCROLL FOR NEXT