सुमित सावंत, शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, ही भूमिका असते. मात्र आता १०० टक्के राजकारणाच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरू झाली आहे. त्याबाबतचे संकेतच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. (Aditya Thackeray News)
त्याचवेळी देशाच्या राजकारणातदेखील शिवसेना प्रवेश करणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसारच आता युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आगामी गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. त्याचीच सुरुवात आता आगामी निवडणुकांमध्ये दिसणार आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या देशभरात वाहत आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात उतरली असून त्याची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार आहे. यावेळी आदित्य डोर टू डोर प्रचार करणार असल्याची माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली.
आदित्य यांच्या प्रचाराचे परिणाम काय?
आदित्य ठाकरे प्रचारासाठी उत्तर प्रदेश आणि गोव्यात जाणार असल्याने देशभरात एक वेगळा संदेश जाणार आहे. शिवसेना किंवा भाजप राजकारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केंद्रित आहे. त्यावेळी देश पातळीवरील भाजपच्या हिंदुत्त्वाला शिवसेनेच्या स्वरूपात नवा पर्याय समोर येईल. तेव्हा शिवसेनेला किती टक्के लोक पर्याय म्हणून स्वीकारतील, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्याबाहेर प्रथमच ‘धनुष्यबाण’ बोधचिन्ह शिवसनेने आजवर अनेक राज्यांतील निवडणुका लढवल्या, पण कधीही शिवसेनेला स्वतःच्या ‘धनुष्यबाण’ या बोधचिन्हावर निवडणूक लढवता आली नव्हती. दादरा व नगरहवेली येथील शिवसेनेच्या पहिल्या खासदार कलाबेन डेलकर यादेखील शिवसेनेच्या बोधचिन्हावर निवडून आलेल्या नाहीत, पण यंदा पहिल्यांदाच परराज्यांमध्ये शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.