Corona Patient sakal media
मुंबई

पनवेलमध्ये कोरोना गारठला; तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

रुग्णसंख्येत लक्षणीय घट

वसंत जाधव

नवीन पनवेल : जानेवारी महिन्यात वाढत चाललेल्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) जोर पनवेलमध्ये (panvel) ओसरू लागला आहे. दिवसाला हजाराच्या घरात गेलेली रुग्णसंख्या घटून १५० ते २००च्या घरात आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोना (corona patients decreases) कमी होवू लागल्यामुळे पनवेल परिसरात दिलासा मिळाला आहे. प्रशासनाचे योग्य नियोजन आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम (corona vaccination drive) उत्तम राबवल्याने रुग्णसंख्या कमी होत आहे.

याचा परिणाम पॉझिटिव्ह दर आता आठ टक्क्यांच्या खाली आला आहे. मुंबई शहराच्या जवळ असल्यामुळे कोरोनाच्या दोन लाटांचा तडाखा पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर बसला होता. कामानिमित्ताने पनवेलकर ठाणे, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी जात असल्यामुळे कोरोनाचा फैलाव पालिका क्षेत्रात वेगात झाला होता. पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना आवश्यक असणाऱ्या बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळवताना दमछाक झाली होती. या कठीण परिस्थितीतून तालुका सावरला असताना पुन्हा तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली होती.

अल्पावधीतच कोरोना रुग्णांची संख्या १२ हजारांच्या वर गेली होती. शाळा सुरू झाल्या, तरी १८ वर्षांच्या खालील मुलांचे प्रतिबंधक लसीकरण न झाल्याने पालक दहशतीखाली आहेत. अशातच आठ दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. थंडीबरोबरच कोरोनाही गारठला असल्याची भावना पनवेलकरांच्या मनात निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत पालिका क्षेत्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३२८८ एवढी आहे. तर ग्रामीण भागातील सक्रिय रुग्ण संख्या ५६९ आहे. पनवेल ग्रामीण भागात तहसीलदार विजय तळेकर यांनी यासाठी कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रात गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सचिन पवार आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह नागरिक आणि संपूर्ण पालिकेला याचे श्रेय दिले जात आहे.

रुग्णांसाठी मार्गदर्शन वेबिनार कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने तज्‍ज्ञ डॉक्टरांचे वेबिनार सत्र आयोजित केले आहे. या मार्गदर्शन सत्रांमध्ये कोरोनाची नियमित लक्षणे आणि तक्रारी, विलगीकरण, मार्गदर्शक तत्त्वे, उपचारांची मानक तत्त्वे, कुटुंबातील सदस्यांनी किती व कशी काळजी घेतली पाहिजे, विलगीकरणादरम्यान आहार आणि पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन कसे करावे? या सर्वांची उत्तरे देण्यात येत आहेत.

कोरोनावर दृष्टिक्षेप

पनवेल महापालिका क्षेत्र एकूण रुग्ण - ९१७४२ बरे झालेले - ८७०५७ मृत्यू - १३९७ सक्रिय रुग्ण - ३२८८ पनवेल ग्रामीण क्षेत्र एकूण रुग्ण - २५००७ बरे झालेले - २३९४३ मृत्यू- ४६५ सक्रिय रुग्ण - ५६९ कोट कोरोनासंबंधित सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सरकारने लागू केलेल्या निर्बंधाची काटेकोरपणे केलेली अंमलबजावणी, प्रभावी लसीकरण व पनवेलकरांनी दिलेली साथ यामुळेच पनवेल परिसरात तिसरी लाट नियंत्रणात आली आहे. - गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT