election  sakal
मुंबई

वसई-विरार महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार

आयोगाने प्रारूप आराखड्यावर हरकती-सूचना मागवल्या

सकाळ वृत्तसेवा

वसई : वसई-विरार महापालिकेची २०२० मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक (vasai-virar municipal election) कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाने प्रशासनाकडून प्रारूप आराखडा मागवून प्रक्रिया सुरू केली आहे. यात हरकती व सुनावणी घेऊन पालिकेने २ मार्चपर्यंत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी, विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास (Maharashtra election commission) पाठवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर एप्रिलमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार असल्याने, प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यानुसार लोकसंख्या, सदस्य दर्शविणारे सहपत्र अंतिम करून मंजुरी आदेश देण्यात आला आहे. निवडणुकीकरिता सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे, हरकती-सूचना मागवणे, त्यावर निर्णय घेणे आदींबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे पत्र निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुंदरकर यांनी पालिकेला दिले आहे. निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात १ फेब्रुवारीला प्रसिद्ध करावी, तर प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचनादेखील त्याच दिवशी मागविण्यात याव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे.

त्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र १६ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे; तर २ मार्चला प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीनुसार विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहे. त्यामुळे मार्चमध्ये आचारसंहिता लागून एप्रिल महिन्यात पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

समस्यांचे मुद्दे चर्चेत वसई-विरार पालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्याने येथे सध्या प्रशासकीय राजवट आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने प्रभागातील समस्यांचे मुद्दे चर्चिले जात नाहीत. त्यामुळे पालिकेची निवडणूक लवकर जाहीर करावी, अशी मागणी सर्वपक्षीय मंडळी करत आहेत. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने पावले उचलून निवडणुकीची पूर्वतयारी करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. वसई-विरार पालिकेचा लेखाजोखा एकूण प्रभाग ४२ एकूण जागा - १२६ महिलांसाठी जागा ६३ मतदार संख्या - १२ लाख ३४ हजार ६९० एका प्रभागाकरिता लोकसंख्या २९ हजार ३९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT