Corona update sakal media
मुंबई

रायगडमध्ये रुग्णसंख्येला ओहोटी; दररोज साडेचारशे नवीन रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात (Raigad) सलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये (corona patients) सातत्याने घट होत आहे. त्यामुळे तिसरी लाट हळूहळू ओसरत (corona third wave) असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज सुमारे ४५० नवीन रुग्णांची भर पडत आहे. रुग्णवाढ सर्वोच्च बिंदूवर असताना ही संख्या अडीच हजारपेक्षा अधिक होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत होते. ओमिक्रॉनमुळे (omicron) हा धोका निर्माण झाला होता, असे जाणकार सांगतात. संसर्गाचा वाढता वेग लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती.

आता साथ आटोक्यात येत असल्याने शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मुलांचे लसीकरणही वेगात सुरू आहे. सध्या कोरोनामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा भार हलका झाला आहे. जानेवारीच्या जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट सर्वोच्च बिंदूवर असताना १२ जानेवारीला एकाच दिवशी दोन हजार ५७६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या दररोज साडेचारशे नवीन रुग्णांची भर पडते. काही दिवसापूर्वी पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे.

आर्थिक मदतीसाठी ४३९८ जणांचे अर्ज कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत म्हणून सरकारकडून ५० हजार रुपये देण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४३९८ जणांच्या अर्ज केले असून यातील ३५४१ अर्ज मंजूर करण्यात आले; तर ५६८ अर्ज अपुऱ्या माहितीमुळे बाद करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली. नातेवाईकांकडून पाठवलेल्या अर्जांची फेर तपासणी करूनच अर्ज मंजूर केले जात आहेत.

निराधार महिलांचे होणार पुनर्वसन रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ७५४ महिला निराधार झाल्या आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या महिलांना विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी काम करणार आहे. विशेष म्हणजे या योजनांसाठीची आवश्यक कागदपत्रे तयार करण्यातही समिती महिलांना मदत करेल. त्यामुळे या महिलांना पुन्हा उभे राहण्यात मोठी मदत होणार असल्याचे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी सांगितले.

मुलांकडून लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद रायगड जिल्ह्यात १५- १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ७६ हजार ७१९ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना साथीवर दृष्टिक्षेप महिना/ सक्रिय रुग्ण / बरे / एकूण मृत्यू १ मे २० / ४५/ २६/३ १ जून २० /५०९/५९८/४१ १ जुलै २० /२२७३/२१८६/१०२ १ ऑगस्ट २० /५६०२/१०९५०/४०१ १ सप्टेंबर २० /५६२५/२४३७६/७९७ १ ऑक्टोबर २० /७३३१/४३३५४/११७२ १ नोब्हेबर २० /४०१२/५४२९६/१४०३ १ डिसेंबर २० /३५७५/५८२५९/१४४४ १ जानेवारी २१ /४५७/६४४१०/१४९० १ फेब्रुवार २१ /६७४/६६४६८/१५२९ १ मार्च २१ /९५९/६८२८१/१६०१ १ एप्रिल २१ /४६७०/७५०७७/१६५८ १ मे २१ /१३१२०/१०७८३५/२१२३ १ जुन २१ /४४३४/१४१९९५/२९०८ १ जुलै २१ /५१९१/१६०१६७/३५२१ १ ऑगस्ट २१ /२८३०/१७६६२३/४२२२ १ सप्टेंबर २१ /७४९/१८३५७७/४४३० १ ऑक्टोबर २१ /९७७/१८७४३५/४५११ १ नोव्हेंबर २१ /८५४/१८७८१९/४५१२ १ डिसेंबर २१ /२१५/१८९३०७/४५७८ १ जानेवारी २२ /७७६/१८९९०५/४५८८ ३० जानेवारी २२ / ५११३/१९०१०३/४६४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT