ulhasnagar muncipal corporation sakal media
मुंबई

उल्हासनगरातील प्रभाग रचनेवर नाराजी; हरकती नोंदवण्यासाठी शिवसेनेसोबत बैठक

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : महापालिकेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीची (Ulhasnagar municipal election 2022) उल्हासनगर पालिकेसाठी ३० पॅनेलसाठी प्रभाग रचना (ward Structure) नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी सोबतच भाजप, रिपाइं या सर्वपक्षीयांनी रचनेवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत (shivsena leaders) बैठक घेतली आहे. मुळ प्रभागाची रचना बदलणे, आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रभागांची रचना बदलून ते इतर प्रभागांना जोडणे, राष्ट्रवादी-शिवसेनेच्या (ncp-shivsena) सोयीनुसार प्रभाग रचना केल्याचा आरोप होत आहे.

पूर्वीचे प्रभाग हे आजूबाजूच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने एकीकडे प्रस्थापितांसाठी आव्हान उभे राहिले आहे; तर गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करताना राबवलेल्या उपक्रमांना तरुण समाज सेवकांसमोर कुणासोबत जायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हासनगर महापालिकेची मुदत ४ एप्रिल रोजी संपत आहे. सध्या महापालिकेत शिवसेनेचे २५, भाजपचे ३२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, साई पक्षाचे ११, रिपाइं आठवले गटाचे ३, काँग्रेसचा १, भारिपचा १ आणि पीआरपीचा १ नगरसेवक आहे.

भाजपचे १७ नगरसेवक हे कलानी समर्थक असल्याने त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. असे असताना महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, उल्हासनगरातील प्रभाग रचनेत आघाडीला झुकते माप दिल्याचा आरोप स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, उपमहापौर भगवान भालेराव, विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे.

१९ प्रभागांत राष्ट्रवादीचे वर्चस्व पॅनेल क्रमांक २, ३, ६, ७, ८, ९, १०, ११ १२, १३, १६, १७, १८, २४, २५, २६, २७, २८, २९ या १९ प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण होईल, अशी रचना केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. या ठिकाणी भाजपला निकराची झुंज द्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. नगरसेवक संख्या ८९ वर नव्या प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची संख्या ७८ वरून ८९ होणार आहे. २९ प्रभाग हे तीन नगरसेवकांचे असून प्रभाग क्रमांक १६ हा दोन सदस्यीय आहे. बहुतांश प्रभाग हे १५ ते १८ हजार मतदारांचे असून सर्वाधिक १९ हजार ५१२ मतदार हे प्रभाग १५ मध्ये आहेत; तर याच प्रभागाच्या बाजूला असलेल्या प्रभाग १६ मध्ये १२ हजार ३९९ असे सर्वात कमी मतदार आहेत. पूर्वीचे प्रभाग हे आजूबाजूच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने एकीकडे प्रस्थापितांसाठी आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT