वाशी : नवी मुंबई महापालिकेचा (Navi mumbai municipal corporation) २०२२-२३चा अर्थसंकल्प (budget) लवकरच सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पासाठी ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक (Ganesh naik) यांनी लोकहिताच्या आणि शहर विकासाच्या अनेक मौलिक सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांच्याकडे केल्या आहेत. प्रभागनिहाय महत्त्वाच्या व आवश्यक कामांसाठी शिफारशी केल्या आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने दोन वर्षे महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज करीत आहेत. लोकप्रतिनिधी मंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विविध सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदन देत बजेटमध्ये विविध कामांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची सूचना केली आहे. २५ वर्षापासून पालिकेतील सत्ताकाळात आमदार गणेश नाईक यांच्या सूचनेवरून मालमत्ताकर आणि पाणीपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षे कोणत्याही प्रकारचा मालमत्ताकर आणि पाणीपट्टीमध्ये वाढ करू नये, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. ५०० चौरस मीटरच्या घरांचा मालमत्ताकर माफ आणि ५०१ ते ७०० चौरस मीटरच्या घरांना मालमत्ता करामध्ये ६० टक्के सवलत देण्याची मागणी त्यांनी केली होती. या बाबींसाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याची सूचना त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता, भविष्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी पाताळगंगा येथील टाटा पॉवर प्रकल्पातून मोरबे धरणापर्यंत पाईपलाईन टाकून हे पाणी मोरबे धरणामध्ये साठवणूक करण्याकरिता अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या सूचना - शहरात सक्षम पायाभूत व दळणवळणाच्या सुविधांची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागवार उड्डाणपूल, रस्ते, स्कायवॉक, पार्किंग प्लाझा, अंडरपास, मार्गिकांची बांधणी करण्यासाठी वित्तीय तरतूद करावी. - ऐरोली-काटई उन्नत मार्गावर ठाणे-बेलापूर मार्गावरून चढण्याकरिता व उतरण्याकरिता स्वतंत्र मार्गिका उभारण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याची सूचना केली आहे. - बेलापूर ते वाशी, वाशी ते ऐरोली आणि ऐरोली ते दिघा असा शहरातील सर्व नोडला जोडणारा कोस्टल रोड तयार करण्याकरिता अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी.
आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सिडकोकडून अधिकचे सुविधा भूखंड हस्तांतर करून विभागवार सार्वजनिक रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे, माता बाला रुग्णालये उभारण्यात यावीत. सर्व नवी मुंबईकरांना वैद्यकीय विमा काढण्यासाठी आर्थिक तरतूद करावी. - स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबईने देशात मोठ्या शहरांमध्ये पहिला नंबर मिळवला आहे. हे बिरूद कायम ठेवण्यासाठी अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करावा. - खेळ संस्कृतीला चालना देण्यासाठी नोडनिहाय मैदाने, क्रीडा संकुल, इनडोअर स्टेडियम निर्माण करावीत.
रोजगार इच्छुक युवक, युवती व महिलांसाठी प्रशिक्षणाच्या योजना सुरू करण्यासाठी बजेटमध्ये निधी राखीव ठेवावा. - पर्यावरण समृध्द नवी मुंबईच्या लौकिकात भर घालण्यासाठी गवळी देव आणि सुलाई देवी या स्थानिक धार्मिक पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी अधिक सुविधा पुरवाव्यात. बटरफ्लाय गार्डन, फ्लेमिंगो गार्डनची निर्मिती करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.