shivsena, BJp esakal
मुंबई

"मुंबईच्या दुरावस्थेला शिवसेनेबरोबरच विरोधी पक्ष भाजपही जबाबदार"

सकाळ वृत्तसेवा

मालाड : पाच वर्षांच्या काळात तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपये या हिशेबाने गेल्या पंचवीस वर्षांत लाखो कोटी रुपये महापालिकेच्या (bmc) माध्यमातून खर्च करूनही मुंबई शहराची अवस्था बिकट झाली आहे. याला शिवसेनेबरोबरच (shivsena) आता विरोधी पक्ष म्हणून नाकाने कांदे सोलणारा भारतीय जनता पक्षही (bjp) तेवढाच जबाबदार आहे, अशी टीका मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या (bmc budget) निमित्ताने जनता दल सेक्युलर पक्षाने (Janata Dal (Secular) party) केली आहे. बँकांमध्ये ८२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी पडलेल्या असताना शहरातील रहिवाशांना शौचालय व सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधाही पुरेशा मिळू शकलेल्या नाहीत.

शिवसेना मुंबई महापालिकेचा गाडा हाकायला सक्षम नाही, याचेच हे द्योतक आहे. त्यामुळे आपण सत्तेच्या आणि शहराच्या खजिन्याच्या चाव्या कुणाच्या हाती देणार, याचा शहरवासीयांनी विचार करण्याची वेळ आली आहे, असे जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर आणि कार्याध्यक्ष सलीम भाटी यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर!

Latest Maharashtra News Updates : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 12 नोव्हेंबरपासून होणार सुरु

Narendra Modi: नरेंद्र मोदींची सभा वळवणार का विदर्भवासियांची मनं?

आजचे राशिभविष्य - 9 नोव्हेंबर 2024

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT