मुंबई : मुंबई महापालिकेने (bmc) आरोग्य अंदाजपत्रकात (Health budget) प्रचंड वाढ करून उपनगरात सेवा सुरू करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे; मात्र दवाखान्यांच्या वेळा नागरिकांच्या सोयीच्या असाव्यात, असा तक्रारीचा सूर व्यक्त होत आहे. दुपारी चारला बंद होणाऱ्या दवाखान्यात (Medical clinic starts) नोकरीहून परत आलेले मुंबईकर तपासणीसाठी जाऊ शकत नाहीत. महापालिकेने आरोग्य खर्चाची तरतूद वाढवून उत्तम पाऊल उचलले आहे. आता दवाखान्याच्या वेळात (clinic time) तेवढा बदल करावा, म्हणजे सेवांचा लाभ घेणे शक्य होईल, अशी मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आणि विलेपार्ले परिसरात सुमारे चार दशके दवाखाना चालवणारे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. सुहास पिंगळे म्हणाले, सामान्य मुंबईकर कामावरून जेव्हा घरी पोहोचतो, तेव्हा रात्री उशिरापर्यंत दवाखाना उघडा ठेवणारे तज्ज्ञच त्यांच्या मदतीला असतात. हे डॉक्टर किती शिकलेले आहेत, यावर सेवांची गुणवत्ता ठरत असते. महापालिकेने अंदाजपत्रकातील खर्च वाढवला, ही चांगली बाब आहे; पण दवाखाने सकाळ-सायंकाळी दोन सत्रामध्ये सुरू ठेवले, तर जनता त्यांचा लाभ घेऊ शकेल.
मुंबई महापालिकेच्या अंदाजपत्रकानुसार येत्या काही महिन्यांत निदान केंद्र सुरू केली जाणार आहेत. ही केंद्रे योग्य प्रकारे सुरू राहावीत आणि उपाययोजनेत प्रभावी ठरावीत, यासाठी नियोजन कसे असेल, याचा आराखडाही ठरवणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे. या केंद्रांमध्ये कोणते चिकित्सक उपलब्ध असतील, तेथे कोणत्या सेवा मिळतील, याचा सर्वंकष आराखडा येत्या काही महिन्यांत तयार करावा आणि तो सार्वजनिक मंचांवरून चर्चेला, यावा अशी मागणी वैद्यकीय संघटना करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.