people protest on property tax issue  sakal media
मुंबई

खारघरमध्ये मालमत्ताकराची होळी; प्रशासनाविरोधात लढा उभारणार

सकाळ वृत्तसेवा

खारघर : पनवेल महापालिकेने (Panvel Municipal corporation) लावलेल्या मालमत्ता कराला (Property tax) विरोध नाही. मात्र तो अन्यायकारक नसावा. पालिकेने ग्रामस्थांना लावलेला मालमत्ता कर तिप्पट-चौपट आहे. तो कमी करण्यासाठी प्रशासनाकडे पत्र व्यवहार करूनही दुर्लक्ष करीत असल्याने खारघरमधील ग्रामस्थांनी (Kharghar people protest) पालिकेसमोर मालमत्ता कराची होळी करून निषेध केला.

पनवेल महापालिका प्रशासनाने खारघर परिसरातील गावांना सहा महिन्यापूर्वी वाढीव मालमत्ता कराची नोटिसा पाठविल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनी पालिकेच्या खारघर प्रभाग कार्यालयात हरकती नोंदविल्‍या होते. महापालिका अस्तित्वात आल्यावर, गावांना ग्रामपंचायतीच्या दरानुसार मालमत्ता कर आकारले जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच खारघरमधील ग्रामस्थांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत वाढीव मालमत्ता कर कमी करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचे निर्णय न घेता प्रभाग कार्यालयात सुनावणी घेतली जात आहे.

सुनावणी घेताना नागरिकांच्या हरकती विचारात न घेता, मालमत्ता कराची मागणी मान्य असल्‍याचा शेरा लिहिला जात असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करीत आहे. यावेळी शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे गोपाळ भगत, रवी भगत, रवींद्र म्हात्रे, विष्णू जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य राम करावकर, ग्रामस्थ केसरीनाथ पाटील, फारुक पटेल, मनेश पाटील, नीलकंठ पाटील, मेघनाथ पाटील, संतोष गायकर आदी उपस्थित होते.

ग्रामस्‍थ लढा उभारणार

महापालिकेने पाठविलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याची तयारी सुरू आहे. संतापलेल्या नागरिकांनी पाठवलेल्‍या वाढीव मालमत्ता कराची होळी करीत पालिकेला निषेध केला. तसेच फेब्रुवारीअखेर पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ॲड सुरेश ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT