Mumbai Kalina Sankul sakal media (Photo- Prashant chavan)
मुंबई

कलिना संकुलात चित्रीकरण कशाला ? विद्यार्थी संघटनेचा सवाल

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) कलिना संकुलातील (kalina sankul) अत्यंत महत्त्वाची जागा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आठ महिन्यांच्या चित्रीकरणासाठी भाडेकरारावर (land on rent for shooting) दिली असून त्या विषयावर महाराष्ट्र स्टुडंट युनियन, बहुजन विद्यार्थी संघटना आदींनी जोरदार आक्षेप घेत याविषयी अनागोंदी झाल्याचा आरोप केला आहे. केवळ नाममात्र दराने पाच एकर जमीन भाड्याने दिल्याने एक चुकीचा पायंडा पडेल आणि विद्यापीठाचा कलिना संकुल हा चित्रीकरण राजकीय सभा आदींचा आखाडा निर्माण होईल, अशी भीती विद्यार्थी संघटनांनी (students union) व्यक्त केली आहे.

एका खासगी संस्थेला जमीन का देण्यात आली, याचा जाब संघटनेने विचारला असून त्याच पार्श्वभूमीवर कुलगुरूंकडे येत्या आठवड्यात बैठक होणार असल्याचे विद्यार्थी संघटनेकडून सांगण्यात आले. मुंबई विद्यापीठाने एका खासगी संस्थेला आठ महिन्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील पाच एकर जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. या ठिकाणी मोठा सेट उभारण्यात आला असून त्यावर हे चित्रीकरण डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे. विद्यापीठाच्या संकुलात एकीकडे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची परीक्षा केंद्रे आदी उपलब्ध नसताना केवळ नाममात्र दराने पाच एकर जमीन आठ महिन्यांच्या भाडेतत्त्वावर देऊन विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या तरतुदींना हरताळ फासला असल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे.

त्रास होत नसल्याचा दावा

सध्या सुरू असलेल्या चित्रीकरणाचा विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक कामकाजाला कोणताही त्रास होत नसल्याचा दावा विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकडून करण्यात आला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या विषयीचा निर्णय घेऊनच ही जमीन भाडेतत्त्वावर देण्यात आली असून त्यासाठी प्रतिएकरी एक लाख रुपये असे भाडे ठरविण्यात आले आहे; तर दुसरीकडे या चित्रीकरणाचा कोणताही गोंगाट अथवा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

चौकशी करण्याची मागणी

विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या एकूणच या दाव्याला नाकारत अशा प्रकारे खासगी संस्थेला जमीन देऊन विद्यापीठाने कोणाचे तरी हितसंबंध जोपासले असून हा प्रकारच भयंकर असल्याने याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. मात्र त्यावर सध्या कोणतीच कारवाई होत नसल्याने हे प्रकरण थंड बस्त्यात असल्याचेही सिनेट सदस्यांकडून सांगण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात यापूर्वी इंडियन सायन्स हिस्ट्रीचे मोठे अधिवेशन झाले. तो कार्यक्रम शैक्षणिक होता. त्यानंतर काही करिअर फेअरवाल्या खासगी संस्थांनी जागा मागितली होती. त्यांना विद्यापीठाकडून जागा देण्यास नकार देण्यात आला होता. मात्र आता खासगी संस्थेला चित्रीकरणासाठी जागा दिल्याने यापुढे विद्यापीठाच्या कलिना संकुलात चित्रीकरणाच्या अनेक संस्था येतील, त्यासोबत राजकीय सभा होतील आणि एक प्रकारचा इथे राजकीय आणि इतर अनागोंदीचा आखाडा निर्माण होईल. त्यामुळे अल्पदराने चित्रीकरणासाठी देण्यात आलेली जागा हे प्रकरण गंभीर आहे.

- सुधाकर तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ.

चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी घेताना विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचा विकास हे केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे. विद्यापीठ कमर्शियल काही गोष्टी करत असेल तर त्याचा पूर्णपणे पत्रव्यवहार होणे आवश्यक आहे. शिवाय जे उत्पन्न मिळत असेल, त्यातून विद्यार्थी विकास होतो का, हे महत्त्वाचे आहे. मात्र तसे होत नसेल आणि कोणाचे हित साधले गेले असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत. यासाठी आम्ही याविषयी लवकरच कुलगुरूंची भेट घेणार आहोत.

- अॅड. सिद्धार्थ इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT