leopard caught sakal media
मुंबई

भाईंदरमधील बिबट्या तीन दिवसांनंतर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील रहिवासी भागात आढळून आलेल्या बिबट्याला (leopard caught) तब्बल तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात वन विभागाला (forest department) यश आले आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रेल्वेच्या हद्दीतील एका नाल्यात बिबट्या लपून बसला होता. त्याला बेशुद्ध करून वनविभागाने ताब्यात घेतले. आता त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay gandhi national park) करण्यात आली आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे येथील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

भाईंदर पश्चिम येथील जय अंबे या झोपडपट्टी परिसरात सोमवारी (ता. ७) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सफाई कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला सर्वप्रथम पाहिले होते. झोपडपट्टी परिसरातून तो लगतच्या रेल्वेच्या गोदाम असलेल्या भागात शिरला होता. याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशमन दलाचे जवान तसेच वन विभागाचे पथकही दाखल झाले. मात्र दिवसभर शोध घेतल्यानंतरही बिबट्याचा ठावठिकाणा लागू शकला नव्हता. बिबट्याची हालचाल टिपण्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, मंगळवारीही यश आले नाही.

बुधवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला बिबट्या दिसला. रेल्वे गोदाम परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला होता. बिबट्याला पाहताच इतर कुत्रे जोरजोरात ओरडू लागले. ते बघण्यासाठी हा कर्मचारी बाहेर आला. त्यामुळे बिबट्याने हल्ला केलेल्या कुत्र्याला सोडून धूम ठोकली. बिबट्या रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या कोरड्या नाल्याच्या उघड्या भागातून आत शिरल्याचे कर्मचाऱ्याने पाहिले. वन विभागाच्या पथकाने ट्रॅप कॅमेऱ्‍यातील फुटेजच्या सहाय्याने नाल्यात त्याचे ठिकाण शोधण्यास सुरुवात केली; परंतु नाला बंदिस्त असल्यामुळे त्याचे नक्की ठिकाण शोधणे कठीण होते. बिबट्याचे नाल्यातील स्थान समजल्यानंतर बंदुकीच्या सहाय्याने बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

तीन दिवस नाल्यातच आश्रय

बिबट्याने दोन ते तीन दिवस या नाल्यातच आश्रय घेतला होता. त्याचे वय साधारणपणे चार ते पाच वर्षे आहे. बिबट्याला सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्रात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहाय्यक आयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. पेठे यांच्यासह ठाणे वन विभागच्या वनसंरक्षक गिरिजा देसाई, मुंबई विभागाचे वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT