तळा, ता. १२ : तळा शहरातील पुसाटी येथील तरुण आकाश शिंदे यांनी कलेतून प्रेरणा घेत शिल्पकला, आर्टकला, चित्रकला, रेखांकन या कलांना वाव दिला आहे. त्यांच्या याच कलांना चालना मिळाली असून त्यातून व्यवसायनिर्मिती करत आहेत. ही तळेकरांसाठी एक अभिमानाची बाब ठरणार आहे.
कृष्णा भोसले
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे लागलेल्या निर्बंधांमुळे अनेक उद्योगधंदे लयाला गेले आहेत. सद्यस्थिती ही पूर्वपदावर येत असली तरी दोन वर्षांत नागरिकांनी अनेक उतारचढाव पाहिले आहेत. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने उपासमारीची वेळही त्यांच्यावर आली. मात्र, या संकटांवर फारच कमी जणांनी मात केली आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे शिल्पकला ते आर्ट कलेला जोपासत तळ्यातील एका तरुणाने चालना दिली आहे. त्यातून त्याने व्यवसायनिर्मिती कशी करता येईल, याकडे लक्ष केंद्रीत करत यशही चांगल्या प्रकारे मिळवले आहे. चित्र आणि शिल्प काढण्यासाठी त्याच्या कलेला मुंबई-पुणेसारख्या ठिकाणांहून चांगली मागणी आहे. या माध्यमातून चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळून आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
तळा शहरातील आकाश सतीश शिंदे या शिल्पकार व आर्टकलाकाराला लहानपणापासूनच घरातून शिल्पकलेचे धडे मिळाले आहेत. घरातच पूर्वीपासून श्रीगणेश मूर्तींचा कारखाना आहे. त्याचाही या शिल्पकाराला उपयोग झाला आहे. या शिल्पकलेतून व आर्टकलेतून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळून हा व्यवसाय साह्यभूत ठरत आहेत. आता तर या कलेला चांगले दिवस आले आहे. या शिल्पकृती जशाच्या तशा हुबेहूब आकर्षक तयार केल्या जात आहेत. या कलेकडे तळ्यातील तरुण वळला आहे. हा व्यवसाय सध्या तळ्यात चांगल्या प्रकारे उदयास येताना पहावयास मिळत आहे.
------------------------------------------------
एक चूक आकारात बदल
शिल्प तयार करताना प्रथम मातीचा वापर नंतर साचा तयार करून फायबरची कास्टिंग केली जाते. त्यानंतर शिल्प तयार केले जाते. थोडी जरी चूक झाली, तर आकारात बदल होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक व लक्ष ठेऊन मेहनतीने या शिल्पकृती तयार केल्या जात आहेत
------------------------------------------------
शिल्पकला आणि आर्टकलेत मेहनत तर आहे. स्केच करताना आणि त्याला आकार देताना बुद्धिमत्ता व हस्तकलेचा वापर करून मोठ्या हुशारीने हे करावे लागते. सावर्डे येथे शिल्पकला आणि जे.जे. आर्ट मुंबई येथे आर्टचे शिक्षण घेतले आहे. आजच्या युगात शिल्पकलेला पूर्वीइतकेच महत्त्व आहे. तयार केलेल्या शिल्पांना चांगली मागणी आहे. मेहनत, आकर्षकता, हुबेहूबपणा व रंगरंगोटी यामुळे मागणी वाढत आहे. यातून आर्थिक उत्पन्नही चांगले मिळते.
- आकाश शिंदे, शिल्पकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.