Corona Vaccination  Sakal media
मुंबई

मुलांच्या लसीकरणात मुंबई पिछाडीवर; केवळ ४९ टक्के मुलांनी घेतला पहिला डोस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रौढांच्या लसीकरणात प्रथम क्रमांकावर असलेली मुंबई किशोरवयीन मुलांचे लसीकरण (Teenager vaccination) करण्यात पिछाडीवर आहे. आरोग्य विभागाकडून (Health Department) मिळालेल्या आकडेवारीनुसार ३५ जिल्ह्यांच्या यादीत मुंबई (Mumbai) २९ व्या क्रमांकावर आहे. सध्या मुंबईतील केवळ ४९ टक्के किशोरवयीन मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

मुंबईत ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. शहरातील एकूण किशोरांची संख्या सहा लाख १२ हजार ४६१ असून, त्यापैकी अवघ्या तीन लाख एक हजार ४१४ किशोरवयीन मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच आतापर्यंत फक्त ४९.२१ टक्के किशोरवयीन मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यभरातील सरासरी ५६.४७ टक्के किशोरवयीन मुलांचा पहिला डोस झाला आहे; मात्र राज्याच्या सरासरी लसीकरणाच्या आकडेवारीच्या तुलनेत मुंबई मागे आहे.

बालरोग कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुल पारेख म्हणाले, की सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे पालक आपल्या मुलांना लस देण्यास घाबरत आहेत. यासह लोकांना आता कोविड गेला असे वाटत आहे.

दोन डोसमध्ये २३ वे स्थान

दुहेरी डोस घेण्यामध्ये मुंबईतील किशोर २३ व्या स्थानावर आहे. शहरात केवळ ६१,३०४ तरुणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. राज्यात दुहेरी डोसची सरासरी आकडेवारी १३.३८ टक्के आहे; तर मुंबईत केवळ १०.१ टक्के किशोरवयीन मुलांनी लशीचा दुसरा डोस घेतला आहे.

हे जिल्हे आघाडीवर

किशोरवयीन लसीकरणाच्या बाबतीत भंडारा ७८.६८ टक्के किशोरवयीन लसीकरणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ सांगलीत ७२.३० टक्के, कोल्हापुरात ७१.४४ टक्के किशोरांना लसीकरण करण्यात आले आहे. पालघरमध्ये ६९.१२ टक्के आणि ठाण्यात ५५.५३ टक्के किशोरांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

मुंबईतील किशोरवयीन मुलांचे लसीकरण संथगतीने सुरू झाले, कारण पूर्वीची केंद्रे कमी होती आणि शाळा आणि महाविद्यालये बंद होती. पूर्वीच्या तुलनेत लसीकरणाचा वेग वाढला आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- डॉ. सचिन पाटील, राज्य लसीकरण अधिकारी

राज्य लसीकरण स्थिती (१३ फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी)
लसीकरणास पात्र मुले ६० लाख ६३ हजार
लशीचा पहिला डोस ३४ लाख २३ हजार ६९६
लशीचा दुसरा डोस ८ लाख ११ हजार ४७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT