Minister Subhash Desai sakal
मुंबई

मराठीच्या अभिजात दर्जासाठी राष्ट्रपतींकडे याचिका पाठवणार - सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे (central government) सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याअनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या जनअभियानाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath kovind) यांच्याकडे याचिका पाठवण्यात येणार आहेत. तसेच केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांच्याकडे राज्यातील मान्यवरांच्या स्वाक्षरीचे पत्र देणार असल्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी सांगितले. तसेच २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिनी मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबतची घोषणा करावी, अशी विनंती करणार असल्याचे देसाई म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, या मागणीसाठी राज्यभरातील मान्यवर एकटवले आहे. सर्व मान्यवरांच्या स्वाक्षरीने राज्य सरकारच्या वतीने पाठवण्यात येणाऱ्या पत्राची परिणामकारकता आणि बळ निश्चितच वाढणार असल्याचे देसाई म्हणाले.

स्वाक्षरी केलेले मान्यवर

सचिन पिळगावकर, अभिनेता
नागराज मंजुळे, दिग्दर्शक
अच्युत गोडबोले, लेखक
विक्रम गोखले, अभिनेता
सई परांजपे, दिग्दर्शिका
प्रशांत दामले, अभिनेता
सुरेश वाडकर, गायक
एअर मार्शल भूषण गोखले, वायुदल
सुभाष अवचट, चित्रकार
शरद कापूसकर, शिल्पकार
सुचेता चापेकर, शास्त्रीय नृत्य
अशोक पत्की, संगीतकार
डॉ. मोहन आगाशे, अभिनेते
रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री
भारती आचरेकर, अभिनेत्री
सुनंदन लेले, क्रीडा पत्रकार
राजेश मापुस्कर, दिग्दर्शक
द्वारकानाथ संझगिरी, क्रीडा पत्रकार
डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
सुनील सुकथनकर, दिग्दर्शक
डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सतीश आळेकर, लेखक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

बाल्कनीच्या कठड्यावर पाय मोकळे सोडून ती... दिव्या भारती कशी पडली? २१ वर्षानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अशी ही बनवाबनवीच्या यशात महेश कोठारेंचाही होता वाटा ; सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर निर्मात्यांनी दिली शाबासकी

Assembly Election 2024: पंतप्रधानांच्या प्रचार दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दीड तास उशीर?

Uddhav Thackeray: भिवंडीत माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची हकालपट्टी, उद्धव ठाकरेंवर केली होती टीका

SCROLL FOR NEXT