मुंबई

सायबर गुन्ह्यासाठी स्‍वतंत्र पोलिस ठाणे

CD

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) ः गेल्‍या काही वर्षांत ऑनलाईन शॉपिंग, डिजिटल पेमेंटचे, नेटसर्फिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. व्यवहाराच्या दृष्‍टीने ते फायद्याचे असले तरी सावधगिरी न बाळगल्‍यास फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. गेल्‍या वर्षभरात सायबर फसवणुकीचे १२२ गुन्हे घडले आहेत. याशिवाय मॉर्फिंगचे १९ तर इतर ४९ असे ऑनलाईन फसवणुकीचे एकूण १९० गुन्हे घडले आहेत. त्‍यापैकी केवळ ४८ गुन्हे उघडकीस आले आहेत. भविष्यात सायबर गुन्ह्यांची वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, नवी मुंबईसाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे बनविणे तसेच परिमंडळ-१ आणि २ मध्ये सायबर सेल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये वाढत्या नागरिकरणामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढले आहे. २०२१ या वर्षामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, महिला अत्याचार, खंडणी, सायबर गुन्ह्यांसह मालमत्ता विषयक, प्राणांतिक अपघात आदी गुन्ह्यांचा आलेख चढता असला तरी या गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना चांगले यश आहे.
वर्षभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी, जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी अशी एकही घटना शहरात घडली नाही. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असताना नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर समाधानी असून शहरातील गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ७४ टक्‍के असल्‍याचे बिपिनकुमार सिंह यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी गुन्हे शाखेचे अपर आयुक्त महेश घुर्ये, गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे, पुरुषोत्तम कराड, शिवराज पाटील, विवेक पानसरे, रूपाली अंबुरे, अभिजित शिवथरे उपस्थित होते.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२१ मध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात गतवर्षीपेक्षा २०१ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. याप्रकरणी एकूण ६५८ गुन्हे दाखल झाले असून ६४४ गुन्हे (९८ टक्के) उघडकीस आले आहेत. तर २०२१ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात ८५ ने वाढ झाली असून एकूण २१२ गुन्ह्यांपैकी २११ गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे लग्नाचे प्रलोभन दाखवून, मित्र अथवा ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा नातेवाईकांकडून झाल्याचे आढळले आहे. तर केवळ एका गुन्ह्यातील आरोपी अनोळखी असून त्‍याचा शोध सुरू आहे. वर्षभरात सोनसाखळी, मोबाईल चोरीच्या गुन्हातही वाढत झाली असून एकूण १०८ गुन्हे घडले आहेत. तर मारहाण, दुखापतीसंदर्भात ५८५ गुन्हे दाखल झाले आहे.

सिटीझन पोर्टलद्वारे यंदा ८६० तक्रारी दाखल झाल्‍या असून त्यापैकी ७२२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर १३८ तक्रारी प्रलंबित आहेत. पुढील काळात गुन्ह्यांची उकल करणे आणि दोषसिद्धीसाठी, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, नागरिकांच्या समस्या व तक्रारींना जलद प्रतिसाद देणे, वाहतूक व्यवस्थापन करणे यांना प्राथमिकता देण्याचा प्रयत्‍न आहे.
- बिपिनकुमार सिंह, पोलिस आयुक्त

चौकट
नवी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून नवी मुंबई पोलिस आयुक्तालयास २ उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण व २ उत्कृष्ट मालमत्ता हस्तगत संदर्भात अशी एकूण चार बक्षिसे मिळाली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी तपास यंत्रणेतील उत्‍कृष्‍ट कामगिरीबद्दल पुरस्‍कार दिले जातात. २०२१ मध्ये महाराष्ट्राला एकूण ११ पुरस्‍कार मिळाले असून एक पुरस्‍कार नवी मुंबई पोलिस आयुक्तालयास मिळाला आहे.

गुन्हेगारीचा आढावा

प्रकार-गुन्हे-उघड
महिला अत्‍याचार - ६५८ - ६४४
बलात्‍कार - २१२ - २११
दरोडा - १० - १०
खून - ४५ - ४०
तोतयेगिरी - ३२ - १६
ऑनलाईन फसवणूक - १९० - ४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT