पेण : मुंबईमध्ये आगरी समाज (Agari community) पूर्वीपासून वास्तव्य करीत आहे. येथील देऊबाई पाटील यांनी मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराची (Siddhivinayak Temple) ( १८०१ साली स्थापना केली; मात्र आगरी समाजाला या मंदिर समितीवर प्रतिनिधित्व मिळावे, असे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील (Suryakant Patil) यांनी म्हटले आहे.
याबाबत सदर संस्थेने वारंवार सरकारकडे निवेदन दिले आहे; मात्र सरकार याकडे कानाडोळा करीत आहे. १९८० साली श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टची स्थापना झाली, त्या वेळी या समितीवर काही काळ आगरी समाजाचे नेते, माजी मंत्री लीलाधर डाके हे अध्यक्ष होते; परंतु त्यानंतर आगरी समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही.
त्यामुळे सरकारने आमच्या समाजाचे दोन प्रतिनिधी या समितीवर घ्यावेत, अन्यथा येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला निवृत्त अभियंता पी. वाय. पाटील, धुरंधर मढवी, द्वारकानाथ वर्तक, गजानन भोईर, सुभाष म्हात्रे, प्रकाश माळी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.