shivsena, BJp sakal media
मुंबई

न्यायालयाचा भाजपला दणका; ४ दिवसांसाठी सेना उमेदवाराला नगरसेवकपद

समीर सुर्वे

मुंबई : न्यायालयीन लढ्यानंतर (court fight) शिवसेनेच्या कोमल जामसांडेकर (Komal Jamsandekar) यांना अखेर नगरसेवक पदाची (corporator) खुर्ची मिळाली आहे. २८ फेब्रुवारीला नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर आज पहिल्या सभागृहाच्या कामकाजात त्या सहभागी झाल्या. मात्र, पालिकेची (bmc) मुदत ७ मार्चला संपणार असून पुढचे फक्त चार दिवस त्या नगरसेवक राहणार आहेत.

जामसांडेकर यांनी कुर्ला एल विभागातील प्रभाग क्रमांक १५९ मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे प्रकाश देवजी मोरे विजयी झाले होते. मात्र, त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राला जामसांडेकर यांनी न्यायालयात आव्हान दिले. अखेरीस पाच वर्षांच्या लढ्यानंतर गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने मोरे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवले, तर त्यांच्या जागी जामसांडेकर यांची निवड जाहीर करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार २८ फेब्रुवारीला महासभेत जामसांडेकर यांची निवड जाहीर झाल्यानंतर आजच्या सभागृहाच्या कामकाजात त्यांनी सहभाग नोंदवला.

नगरसेवक वाढले

शिवसेनेचे सध्या ९७ निवडून आलेले नगरसेवक असून दोन स्वीकृत सदस्य आहेत; तर आता सर्व नगरसेवकांची मिळून १०० संख्या झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पाच नगरसेवक पोट निवडणुकीत तसेच जात पडताळणीत निवडून आले, असे पाच वर्षे शिवसेनेचे नगरसेवक वाढत असताना शेवटच्या आठवड्यात जामसांडेकर यांच्या रुपाने शिवसेनेचा नगरसेवक वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT