vasai virar crime sakal media
मुंबई

वसई-विरारमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; भरदिवसा गोळीबाराच्या घटना वाढल्या

सकाळ वृत्तसेवा

वसई : वसई-विरार (Vasai-Virar) शहरात गुन्हेगारांमध्ये (criminals) पोलिसांचा दरारा कमी झाला आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. कारण मागील काही दिवसांपासून शहरात दिवसाढवळ्या हत्या, गोळीबाराच्या घटना (Murder crime) घडत आहेत. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ६ फेब्रुवारी रोजी विरार येथे भरदिवसा गोळीबाराची घटना (bullet firing crime) घडली. यात एकाचा मृत्यू झाला; तर दोन दिवसांनी वसईच्या एका लॉजमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. २८ तारखेला विरारमध्ये ठेकेदारावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला (Attempt to murder) झाला. हे थांबते न थांबते तोवर विवाहाला विरोध करत विवाहित महिलेच्या भावाने भावजीवर गोळी झाडली. यात तो जखमी झाला. चार दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरले आहे.

वसई-विरार शहराची वाढती लोकसंख्या व दाटीवाटीच्या वस्त्या असल्याने कोण कुठून आले आहे, याचा शोध घेणे कठीण होत आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे लोक अशा वस्तीत आश्रय घेतात व अनेकदा गुन्हे करून पसार होत असतात. एकीकडे मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून गुन्ह्यांबाबत तपास तातडीने केला जात आहे; मात्र तरीदेखील गुन्हेगारांवर जरब बसत नसून हत्या, चोरीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे आयुक्तालयासमोर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चिंतेचा विषय बनत आहे.

अनधिकृत बांधकामांमुळे गुन्हेगारी

अनधिकृत बांधकामाचे जाळे वसई-विरार शहरात पसरत चालले आहे. त्यामुळे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना खतपाणी मिळत आहे. धमक्या देणे, मारहाण करणे अशा घटना वाढत आहेत. अनधिकृत बांधकामातून येणारा पैसा आणि त्यातून डोळ्यावर येणारी धुंदी गुन्हेगारीला कारणीभूत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT