अलिबाग : थंडीचा हंगाम सरत असतानाच रायगड (Raigad) जिल्ह्यात उष्णतेच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. याच काळात अलिबागसह, पेण तालुक्यातील २१ गावे व १३१ वाड्यांमध्ये सुमारे २८ हजार नागरिकांना पाणीटंचाईचा (water scarcity) सामना करावा लागत आहे. या ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा (tanker water supply) करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यामुळे आता सुमारे १२ टॅंकरद्वारे पुरवठा सुरू झाला आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे ११ कोटी ३९ लाख रुपयांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यामध्ये टंचाईग्रस्त गावे-वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, नळपाणी योजनांची दुरुस्ती, विंधनविहिरी खोदणे, विहिरींमधील गाळ काढणे तसेच इतर उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली.
अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली, मानकुळे या दोन गावांसह पेण तालुक्यातील १९ गावे व १३१ वाड्यांमध्ये पाण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी प्लास्टिकचे ड्रम घेऊन महिला दीड ते दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. अलिबाग, पेण या दोन तालुक्यांमधील २१ गावे व १३१ वाड्यांवर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या गावे वाड्यांना १२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कर्जतमध्ये पायपीट वाढली
कर्जत तालुक्यात उल्हास, कोल्हारे, पेज, पोश्री या प्रमुख नद्या आहेत. उल्हास, पेज नदीवगळता उन्हाळ्यात बाकी नद्या कोरड्या पडतात. त्यामुळे या नद्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी खालावून कूपनलिका आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या नळपाणी योजना बंद पडतात. परिणामी या गावे वाड्या-पाड्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.
पाणीटंचाईच्या समस्येवर मत करण्यासाठी विंधनविहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी कर्जत तालुक्यात पाणीटंचाई भासणाऱ्या गावे व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी ३५ लाख ६५ हजारांच्या निधीची तरतूद करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावे, वाड्यांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. धरणे, विहिरींमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये बोअर बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, रायगड जिल्हा परिषद
दिलासा मिळणार
पेण तालुक्यातील गावे, वाड्यांमध्ये दर तीन दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा मुबलक मिळत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे टॅंकरमार्फत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात या गावे, वाड्यांमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
तालुका - टंचाइगग्रस्त गावे - वाड्या - टँकर
अलिबाग - ०२ - ०० - ०१
पेण - १९ - १३१ - ११
एकूण - २१ - १३१ - ११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.