वसई : वसई-विरार (vasai-virar) शहराला पाणीपुरवठा (water supply) करण्यात येणाऱ्या धरणात जरी मुबलक साठा आहे; मात्र पालिकेकडून पाणी वितरण व्यवस्थित केले जात नसल्याने अनेक भागांना टंचाईची झळ (water scarcity) बसत आहे. ज्या भागाला पाणी मिळते तेदेखील कमी दाबाने मिळत आहे, अशी तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच नागरिकांवर टँकरने पाणी (tanker water) घेण्याची वेळ आली आहे. महापालिका क्षेत्रात (vasai-virar municipal corporation) २५ लाखांहून अधिक लोकसंख्या आहे.
त्यामुळे त्या प्रमाणात पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे, परंतु उन्हाळ्यातच पाणी मिळताना नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत. धामणी धरणात ६५ टक्के, उसगाव धरणात ६५ टक्के; तर पेल्हार येथील धरणात ४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची झळ बसणार नाही, अशी आशा वसई-विरारकरांना होती; मात्र वसई-विरार महापालिकेकडून पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करता येत नाही. त्यामुळे काही भागांना पुरेसे पाणी मिळत नाही. नायगावमध्ये अनेक इमारतींना पाणी मिळत नसल्याने टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे.
तर विरार-मनवेल पाडा, सहकार नगर, जानकीनगर, गोपाळ चाळ या ठिकाणीदेखील पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे महागड्या पाण्याच्या बाटल्या येथील नागरिकांना आणाव्या लागत आहेत. वसईच्या उमेळे परिसरात तर सहा दिवस पाणी आले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालिका प्रशासन जागे झाले. महामार्गावरील कामण चिंचोटीसह आजूबाजूच्या गावपाड्यांत उन्हाचे चटके सहन करत पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे धरणात जरी मुबलक पाणी असले, तरी कुणी पाणी देईल का पाणी असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
टँकरची चलती
पाणी येत नसल्याने अनेक गृहसंकुलांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. त्यामुळे टँकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावू लागले आहेत. महापालिकेला पाणीपट्टी भरली जाते; मात्र पाणी येत नाही म्हणून टँकरचे पाणी खरेदी करावे लागत आहे. त्याचे पैसे कोण देणार, असा सवाल नागरिक करत आहेत.
जलवाहिन्यांना गळती
जरी महापालिका पाण्यासाठी लाखो-करोडो खर्च करत असली, तरी महामार्गापासून ते अगदी शहरात अंथरण्यात आलेल्या जलवाहिन्यांची गळती महिन्यातून वारंवार होत असते. झडपांमधूनदेखील पाणी वाया जात असते. त्यामुळे पाणी वितरणावर परिणाम होतो आहे. अनियमित व कमी दाबाने पाणी नागरिकांना मिळते आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.