सफाळे : पालघर (Palghar) जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या (corona active patients) केवळ सात आहे. यातील पाच रुग्ण ग्रामीण भागात, तर दोघे शहरातील आहेत. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत ७० टक्क्यांहून अधिक बाधितांचे प्रमाण (corona patients decreases) कमी झाले, तर एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे काहीच दिवसातच संपूर्ण पालघर जिल्हा कोरोनामुक्त होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती (Dnyaneshwar sambare) ज्ञानेश्वर सांबरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे यांनी माहिती दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण १००.५ टक्के आहे; तर बाधित रुग्णांचा दर आठ टक्के आहे. कोरोना काळात आशा भगिनींचेही मोलाचे योगदान असून आजही आशा किंवा आरोग्य विभागाचे हे काम थांबलेले नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात चार लाख ९६ हजार ९६२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ६१ हजार २६७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत; तर एक हजार २२५ रुग्णांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल असण्याचे श्रेय जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आहे. आरोग्य विभागाने बाधित रुग्णांबाबत अंदाज वर्तवल्यामुळे कोरोनाबाबतची अचूक व कमी-जास्त रुग्णसंख्या समोर आली. त्यामुळे जिल्हा कोरोना मुक्तीकडे जाईल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याचे सांबरे म्हणाले.
जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी
चाचण्या १६,०२,५५५
कोरोनाबाधित १,५८,६०६
रुग्ण पूर्ण बरे १,५५,२९५
मृत्यू ३,३०४
वसई-विरार शहरात महिन्याभरात १८ बाधित
वसई, विरार शहरात कोरोनाची आकडेवारी पाहता मार्च महिन्यात एकूण १८ बाधित आढळले होते. त्यातील १६ रुग्ण बरे झाले असून सौम्य लक्षणे असणारे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोनाबाधित व मृत्यूची संख्या वाढत असताना सार्वजनिक नियम काटेकोर व दुसरीकडे लसीकरणावर भर दिल्यामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र नागरिकांनी मास्क व सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन वसई-विरार महापालिका प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.