Bjp and shivsena Sakal Media
मुंबई

भाईंदर : भाजप, महाविकास आघाडीत बंडखोरी; नगरसेवकांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदर पालिकेच्या (Mira bhayandar municipal corporation) सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी (election) सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) बंडखोरी झाली आहे. दोन्ही पक्षातील अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे एका प्रभाग समितीमध्ये भाजपच्या (bjp) पाठिंब्यावर शिवसेनेच्या (shivsena) नगरसेविकेने उमेदवारी दाखल केली आहे.

सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी बुधवारी (ता. ६) निवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती एक, दोन आणि चारमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात भाजपच्या बंडखोरांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. भाजपमध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांचे गट आहेत. प्रभाग समिती एकसाठी मेहता गटाच्या वर्षा भानुशाली यांनी उमेदवारी दाखल केली.

मात्र, त्यांच्याविरोधात व्यास गटाचे डॉ. सुशील अग्रवाल यांनीही अर्ज दाखल केला आहे; तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या शर्मिला बगाजी यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग समिती दोनमध्ये मेहता गटाच्या रिटा शहा यांच्याविरोधात व्यास गटाचे पंकज पांडे; तर प्रभाग समिती चारमध्ये मेहता गटाच्या रूपाली शिंदे यांच्याविरोधात व्यास गटाचे विजयकुमार राय यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग समिती चारमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नरेश पाटील निवडणूक लढवणार आहेत. नरेश पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असले, तरी ते भाजपशी घरोबा ठेवून आहेत.

प्रभाग समिती सहामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे अनिल सावंत यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे आणि त्यांना भाजपने समर्थन दिले आहे. अनिता पाटील या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या असल्या, तरी त्यादेखील भाजपसोबतच आहेत. दोन वर्षापूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीत अनिता पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली होती. त्याचे फळ म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग समिती तीनमध्ये भाजपचे गणेश भोईरविरुद्ध मविआचे अनंत शिर्के अशी थेट लढत होणार आहे; तर प्रभाग समिती पाचमध्ये केवळ भाजपच्या वंदना भावसार यांचाच उमेदवारी अर्ज आला असल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे.

भाजपकडे बहुमत

वास्तविक सहा प्रभाग समित्यांमध्ये भाजपकडेच बहुमत असल्यामुळे दर वेळी भाजपचेच सभापती निवडून आले आहेत; मात्र या वेळी भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे झालेल्या बंडखोरीचा लाभ महाविकास आघाडीला होणार की ऐनवेळी वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप होऊन दोन्ही गटात समेट घडवला जाणार, हे निवडणुकीच्या वेळी स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT