Money Fraud sakal media
मुंबई

भाईंदर : खासगी रुग्णालयांकडून कोट्यावधींचा घोटाळा ?

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत (corona first wave) सुरुवातीच्या काळात काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करण्यात येत होती. यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोना रुग्णांचाही महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला आणि योजनेशी अंगीकृत असलेल्या खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले, परंतु मिरा-भाईंदरमधील अंगीकृत खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून (corona patients) लाखो रुपयांची देयके वसूल केली असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसने केला आहे. शहरातील ८५१ रुग्णांची सुमारे १० कोटी रुपयांची फसवणूक (Ten crore fraud) करण्यात आली असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला असून या खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई झाली नाही, तर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोव्हिड काळात कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारने कोरोना रुग्णांचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला. मिरा-भाईंदरमध्ये या योजनेशी अंगीकृत पाच खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत सरकारी आदेश लागू झाल्यानंतर कोरोना रुग्णांवर संपूर्ण मोफत उपचार होणे अपेक्षित होते; मात्र रुग्णांना या योजनेबाबत पूर्णपणे अंधारात ठेवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची देयके रुग्णालयांनी वसूल केली; शिवाय रुग्णालयांनी खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून सरकारकडूनही रक्कम उकळली असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी दीप काकडे यांनी केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

युवक काँग्रेसने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. ८५१ कोरोना रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या रकमेचा परतावा त्यांना तातडीने देण्यात यावा, घोटाळा करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, तसेच दोषी सरकारी अधिकऱ्यांना बडतर्फ करावे आदी मागण्या युवक काँग्रेसने जिल्हाधिकऱ्यांकडे केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर येत्या ११ एप्रिलपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली असता विषयाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती तातडीने गठित करण्याचे अश्वासन दिले आहे.

- दीप काकडे, युवक काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT