पालघर : मनुष्य जीवनात वाचनाचे (Reading Importance) खूप महत्त्व आहे. मनुष्य जे वाचतो, जे लिहितो ते कधीही विसरत नाही. पुस्तक वाचनातूनच (book reading) जीवनात आनंद येतो, असे मत इनर व्हीलच्या अध्यक्ष सुनीता जैन (sunita jain) यांनी व्यक्त केले. इनरव्हील क्लब ऑफ पालघर आणि सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत मुक्ताई पाटील यांच्या स्मरणार्थ स्व. नामदेव भाऊ पाटील नागझरी सभागृहात ग्रंथालय (Library) बनवण्यात आले आहे. त्या ग्रंथालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या उद्घाटनप्रसंगी सुनीता जैन बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष दिपेश पावडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्षा स्वाती पाटील आणि देशात पाचवा क्रमांकावर युसीजी नेट परीक्षेतून यश प्राप्त केलेल्या श्वेता पाटील या उपस्थित होत्या.
दिपेश पावडे म्हणाले की, मुक्ताई पाटील यांनी अगदी हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्व मुलांना नातवंडांना उच्चशिक्षित केले.
त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल जिल्हा परिषदेतर्फे त्यांचा आदर्श माता म्हणून गौरव करण्यात आला होता. आज त्यांच्या स्मरणार्थ हे ग्रंथालय सुरू झाल्यामुळे आपल्या परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. कार्यक्रमाला रोटरीचे भगवान पाटील, इनर व्हीलच्या मंजुश्री पाटील, क्लब सचिव प्रीती पाटील, मंडळाचे विश्वस्त कमलाकर पवार, सचिव अमोल पावडे, उपाध्यक्ष वैभव पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.