मुंबई : मुंबईकरांना घराजवळच दर्जेदार उपचार (Medical treatment at house) मिळावेत म्हणून पालिकेने पाऊल उचलले आहे. २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात (Budget) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेल्थकेअर सेंटर’ (Balasaheb Thackeray health care center) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पालिकेने (bmc) आता पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील दहा दवाखाने निवडले आहेत. त्यांचे आरोग्य सेवा केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत मुंबईकरांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून घराजवळच उपचार करून घेता येतील.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त महापालिकेने मुंबईकरांना नवीन भेट दिली आहे. पालिकेने अर्थसंकल्पात दोनशे आरोग्य केंद्रे सुरू करण्याची घोषणा केली होती. ती केंद्रे दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सुरू होणार होती. पालिकेने यंदाच्या वर्षी शंभर केंद्रे सुरू करण्याची योजना आखली असून, त्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. त्याअंतर्गत पालिकेने उपनगरातील दहा दवाखाने निवडले आहेत. त्यांचे आरोग्य केंद्रात रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होईल. आरोग्य सेवा केंद्रे सुरू झाल्यानंतर पालिकेच्या उपनगरातील आणि इतर मोठ्या रुग्णालयांचा ताण कमी होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
चाचणीची सुविधाही उपलब्ध
डॉ. मंगला गोमारे यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रात १३६ चाचणी सुविधा असतील. आरोग्य केंद्रांत करता न येणाऱ्या चाचण्या नजीकच्या खासगी निदान केंद्रात केल्या जातील. त्यासाठी रुग्णांना आरोग्य केंद्राकडून एक कूपन देण्यात येईल. ते त्यांना खासगी केंद्रातील रुग्णांना द्यावे लागेल. जेणेकरून त्यांना तेथे मोफत चाचणी करता येईल. याशिवाय सिटी स्कॅन, टुडी इको, मॅमोग्राफी, सोनोग्राफी आणि ईसीजीची सुविधाही आरोग्य केंद्रांमार्फत रुग्णांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना मोठ्या रुग्णालयांची गरज भासल्यास त्यांच्यासाठी टेलिकन्सल्टिंग सुविधा सुरू करण्याचा आमचा विचार आहे. मात्र, वाढती मागणी लक्षात घेऊन ती उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा
आरोग्य केंद्रांमध्ये सुरुवातीला बालरोग, स्त्रीरोग आणि औषध तज्ज्ञ उपलब्ध करून दिले जातील. ते तीन ते चार तास आपली सेवा देतील. सर्व वैद्यकीय तज्ज्ञ विशेष निमंत्रित असतील. मागणीनुसार केंद्रात विविध आजारांचे तज्ज्ञही नेमण्यात येतील, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
ही आहेत आरोग्य केंद्रे
- गुरू नानक (आंबेडकर) दवाखाना, वांद्रे प. (एच-पश्चिम)
- व्ही. एन. शिरोडकर दवाखाना, अंधेरी पू. (के-पूर्व)
- एन. जे. वाडिया दवाखाना आणि बनाना लीफ दवाखाना, अंधेरी प. (के-पश्चिम)
- राठोरी दवाखाना, मालाड (पी-उत्तर)
- शैलजा विजय गिरकर दवाखाना, कांदिवली (आर-दक्षिण)
- काजूपाडा दवाखाना, बोरिवली (आर-मध्य)
- वाय. आर. तावडे दवाखाना, दहिसर (आर-उत्तर)
- साईनाथ दवाखाना, घाटकोपर (एन वॉर्ड)
- टागोरनगर (सनसिटी) दवाखाना, विक्रोळी (एस वॉर्ड)
- डीडीयू मार्ग दवाखाना, मुलुंड (टी वॉर्ड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.