लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आगामी ‘शेर शिवराज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रतापगडाला भेट दिली. ढोल-ताशांच्या गजरात आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात ‘शेर शिवराज’ चित्रपटातील कलाकारांचे साताऱ्यातील स्थानिकांनी जंगी स्वागत केले.
प्रतापगडावरील भवानीमातेचा आशीर्वाद घेत इतिहासाचे आणि चित्रपटातील किस्स्यांचे अनेक पैलू यावेळी चित्रपटातील कलाकारांनी उलगडले. याप्रसंगी ‘शेर शिवराज’ चित्रपटातील अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, विक्रम गायकवाड, अक्षय वाघमारे आणि निर्माते प्रद्योत पेंढरकर, नितीन केणी उपस्थित होते. गडकोटांच्या संवर्धनासाठी अग्रेसर असणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांच्या कार्याला सलाम म्हणून ‘शेर शिवराज’ चित्रपटाचे निर्माते चिन्मय मांडलेकर, प्रद्योत पेंढरकर, नितीन केणी यांनी श्रमिक गोजमगुंडे यांना धनादेश सुपूर्द केला. शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची, संयम, शिष्टाई आणि चतुराई या अद्भुत गुणांचे दर्शन ''शेर शिवराज'' या चित्रपटातून घडणार आहे. ''शेर शिवराज'' चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, सुश्रूत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. २२ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.