ठाणे, ता. ९ : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने गुरुवारी रात्री भिवंडी -चिंचोटी मार्गांवर कारवाई करून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा पकडला. या कारवाईअंतर्गत तब्बल १ हजार ९९० मद्याचा बाटल्या जप्त करण्यात आल्या. राज्य उत्पादन शुल्क पथकाने एकूण ५५ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भिवंडी-चिंचोटी मार्गावर खाडीच्या पुलावर एका टेम्पोतून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एन. एन. मोरे आणि गोविंद पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोची तपासणी केली. यावेळी त्या टेम्पोत विविध विदेशी कंपन्यांचे गोवा बनावटीच्या मद्याच्या तब्बल १ हजार ९९० बाटल्या आढळून आल्या. त्याचप्रमाणे केमिकलचे ड्रम ही या वेळी हस्तगत करण्यात आले. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.