scotish kada climbed by team point break adventure sakal
मुंबई

स्कॉटिश कडा सर करत बाबासाहेबांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ५५० फूट उंच असलेल्या नाशिक येथील स्कॉटिश कडा सर करत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी बाबासाहेबांना अनोखी मानवंदना

सकाळ वृत्तसेवा

वसई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ५५० फूट उंच असलेल्या नाशिक येथील स्कॉटिश कडा सर करत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली. कड्यावर तिरंगा फडकवत डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार करण्यात आला.नाशिक येथे हरिहर किल्ल्याची उंची तीन हजार ६७६ इतकी आहे. याठिकाणी स्कॉटिश कडा ९० अंशातील ५५० फूट उंचीवर आहे. कड्यावर चढाई करणे अवघड आहे. यातच प्रचंड उष्णतेची लाट या भागात आहे; परंतु जिद्दीने एकूण २५ सदस्यांनी कड्याची चढाई पार करण्याचा निर्णय घेतला.

निरगुडपाडा गाव येथून सुरुवात केली. अनेक अडथळ्यांचे आव्हान झेलत सदस्यांनी अखेर शेवटचे टोक गाठले. उंचावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देताना सदस्यांचा आवाज सह्याद्रीच्या पर्वत रांगात निनादत होता.

हे सदस्य मोहिमेत सहभागी
टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंके, समीर देवरे, विशाल बोडके, तेजस जाधव, मंदार चौधरी, सिद्धार्थ सुमन, गुलाबराव बाविस्कर, महेश जाधव, अमोल शिंदे, बालाजी जामखेडे, गोकुळ पाटील, सागर शिंदे, प्रज्वल शिंदे, शशी पारसे, राजश्री चौधरी, अनुप इंगोले, सागर चौधरी, माही बारीस, सुवर्णा कांगणे, डॉ. समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT