उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळावा
पनवेल, ता. १८ : उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून २२ एप्रिलपर्यंत पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पीव्हीसी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित शिबिरात इंडियन मेडिकल असोसिएशनचे आणि उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेतील लाभार्थी हे २०११ मध्ये जातीनिहाय, सामाजिक, आर्थिक जनगणना आदी निकषांवर आधारित असून त्याअंतर्गत ८३.६३ लाख इतक्या लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात ई कार्ड वाटप होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.