Food Oil Sakal
मुंबई

मुंबईत खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाल्याने गोरगरिबांचे जगणे मुश्किल

सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्या मुंबईतील शेकडो गोरगरिबांना खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाल्याने जगणे मुश्किल झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्या मुंबईतील शेकडो गोरगरिबांना खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाल्याने जगणे मुश्किल झाले आहे.

मुंबई - कोरोनामुळे (Corona) मागील दोन वर्षांत आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या आणि त्यातून थोडेसे बाहेर येणाऱ्या सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्या मुंबईतील (Mumbai) शेकडो गोरगरिबांना खाद्यतेलाचे (Food Oil) भाव दुप्पट (Rate Double) झाल्याने जगणे मुश्किल झाले आहे. अनेकांनी आपल्या घरातील रोजच्या वापरातील तेलाच्या वापरावरच अंकुश आणला आहे; तर काहींनी तळणाच्या पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवत फोडणीच्या तेलाचीही काटकसर सुरू केली आहे.

खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले असल्याने गृहिनींचे गणितच बिघडले आहे. उन्हाळ्यात तयार करण्यात येणारे आणि वर्षभर पुरतील एवढ्या प्रमाणात बनवल्या जाणाऱ्या कुरड्या, पापड आदी तळणाचे पदार्थ बनविण्यास गृहिणींनी आता हात आखडता घेतला असल्याचे मुंबईतील गृहिणींकडून सांगण्यात आले.

खाद्यतेलामध्ये वापरात येणाऱ्या प्रामुख्याने शेंगतेल, पामतेल, करडई, तीळ, सूर्यफूल, राई आदी सर्व खाद्यतेलांचे आणि त्यातील फिल्टर, रिफाईंड आणि खुल्या तेलाचे जवळपास भाव दुपटीहून अधिक वाढले आहेत. यात होलसेल बाजारात १६० रुपयांना मिळणारे शेंगतेल हे ग्राहकांना १९० ते २०० रुपये किलोने मिळत असून १५ लिटरच्या डब्याची किंमत दोन हजार ९०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सूर्यफूल, पामतेल, राईतेलांचे भावही वाढले असून दुसरीकडे करडई तेल तर बाजारात मिळणेही कठीण झाले आहे. जे मिळते त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने त्याचा वापरही कमी झाला असल्याचे सांगण्यात आले.

खाद्य तेलाचे भाव इतके वाढलेले असल्याने आमच्या घरातील फोडणीला वापरणाऱ्या तेलात काटसर सुरू केली. एक-एक थेंब जपून वापरतोय. कुरड्या, पापड आणि तेल अधिक लागत म्हणून लोणचेही घालण्याचा विचार सोडलाय.

- इंदिराबाई राठोड, साठेनगर, मानखुर्द.

तेलाशिवाय जेवणात चव येत नाही; परंतु त्याच्या किमती वाढल्याने सर्व चव निघून गेली आहे. सगळीच महागाई वाढली, आता त्यात तेलाने भर टाकली असल्याने सगळे गणित बिघडले आहे.

- विमलबाई कसबे, पार्कसाईट, विक्रोळी.

उद्योजक व्यवसायात गुंतवणूक करताना फायदा बघतच असतो. भाव आणखी वाढवतील. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि तेलासाठा करून ठेवलेली मंडळी यातून आपला अधिक नफा काढतील.

- विनोद चौगुले, खाद्य तेलाचे होलसेल व्यापारी.

खुल्या किरकोळ बाजारातील तेलाचे भाव

तेलाचे प्रकार किलो/लिटर १५ लिटरचा डब्बा

शेंगतेल १९० ते २१० किलो २९०० ते ३,०००

सूर्यफूल १९५ ते २१० (लिटर) २८०० ते २७००

पामतेल १६५ ते १८० (लिटर) २६०० ते २७००

राईतेल १९० ते २२० (लिटर) २३०० ते २६००

एपीएमसी बाजारातील तेलाचे भाव

तेलाचे प्रकार किलो / लिटर १५ लिटरचा डब्बा

शेंगतेल १७५ २८५० ते २९००

सूर्यफूल १९५ २७५० ते २८००

पामतेल १५५ २६०० ते २६५०

तीळतेल २१० ३२०० ते ३३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT