Alibag Dumping ground fire sakal
मुंबई

Alibag Dumping ground fire : अलिबागकरांचे आरोग्य धोक्यात!

दोन दिवसांपासून नागरिकांना धुराचा त्रास; काळजी घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : शहरातील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे दोन दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये धुराचे लोट येत आहेत. या धुरामुळे शहरातील मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. धुरामुळे श्वसन विकार होण्याचाही धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

शहराचे आरोग्य हे तेथील सार्वजनिक स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. मात्र, अलिबाग शहरातील कचरा डेपोला सोमवारी रात्री लागलेल्या आगीमुळे दोन दिवसांपासून काही भागांत धुराचे लोट अजूनही आहेत. यामुळे स्थानिकांचे डोळे जळजळत असून काहींना श्‍वसनाचा त्रास होत आहे.

नागरिकांना शुद्ध हवेची गरज मोठ्या प्रमाणात असते. शुद्ध हवा नसेल, तर त्याचा मानवी आरोग्यावर निश्चित परिणाम होतो. डम्पिंगवरील कचरा जाळल्याले परिसरात प्रदूषण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

लहान बाळ, गर्भवती महिलांना शुद्ध हवेची गरज असते. त्यांना शुद्ध हवा न मिळाल्यास त्यांच्या आरोग्यावर लवकर परिणाम होऊ शकतो. डोळे, त्वचा यांचेही आजार होऊ शकतात. धुरामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते. त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यांची वाढ खुंटू शकते. अस्थमा असलेल्या रुग्णांना धुराचा त्रास लवकरच जाणवतो. त्यात खोकला वाढण्याची शक्यता अधिक असते. डोळ्यांची जळजळ होण्यापासून धुराच्या संपर्कात राहिल्यास फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत काळजी घेणे आवश्यक आहे.
डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय

अलिबाग शहरामध्ये दोन दिवसांपासून धुरामुळे प्रचंड त्रास होऊ लागला आहे. दोन दिवसांपासून लहान मुलांमध्ये खोकल्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या धुराचा खोकला लवकर बरा न होणारा आहे. त्यामुळे नगरपरिषदेने धूर वाढणार नाही, याची काळजी घेऊन मानवी आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. या धुरामुळे श्वसन नलिका लहान होतात. त्यामुळे दम्याचा विकार वाढू शकतो.
- डॉ. विनायक पाटील, बालरोग तज्‍ज्ञ

धूर किंवा धुरामुळे तयार झालेल्या कार्बन कणांमुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळे कोरडे पडणे, लाल होणे, डोळ्यांतून सतत पाणी वाहणे, डोळ्यांत टोचणे आदी त्रास होऊ शकतो. सततच्या धुरामुळे डोळ्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अचानक उद्भवलेल्या धुराने असे त्रास होऊ नये, यासाठी बाहेर जाताना गॉगल, चष्मा, गाडीवर हेल्मेट वापरणे. डोळ्यांच्या पापण्या थंड पाण्याने व बर्फाने शेकणे. झोपताना डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या थोडा वेळासाठी ठेवू शकता.
- डॉ. अजय इंगळे, नेत्ररोग तज्‍ज्ञ

धुरामुळे महिलांसह सर्वच स्तरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. गर्भवती महिलांसह ज्यांना दमा आहे, अशा व्यक्तींचा दमा वाढू शकतो. ज्या रुग्णांना कोरोना होऊन गेला आहे, त्या रुग्णांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असून मास्क लावणे गरजेचे आहे.
- डॉ. अनिल फुटाणे, स्त्रीरोग तज्‍ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT