मुंबई

लांब पल्‍ल्‍याच्या एसटीची प्रतीक्षा

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : पर्यटन स्थळ असल्याने अलिबाग येथे मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे; मात्र अलिबाग आगरातून सुटणाऱ्या शेगाव, तुळजापूर, गाणगापूर, संभाजी नगर यांसारख्या लांब पल्ल्याच्या एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्‍याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी गाड्या आहेत, मात्र वाहक-चालक नसल्याने फेऱ्या बंद करण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळावर ओढवली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असूनही दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या एसटी गाड्यांची संख्या खूपच कमी आहे. पूर्वी ज्या एसटी फेऱ्या नफ्यात होत्या, त्या कोरोना काळात बंद झाल्या. प्रवाशांच्या आग्रहाखातर यातील काही फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या होत्या; मात्र त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ज्या फेऱ्या बंद झाल्या, त्या आजतागायत सुरू झाल्या नाहीत.
मनुष्‍यबळ कमी असल्‍याचे कारण एसटी महामंडळाकडून देण्यात येत आहे. लांब पल्‍ल्याच्या मार्गावर जाण्यास कर्मचारी तयार नसतात, त्यामुळे त्‍या फेऱ्या बंद ठेवाव्या लागत असल्याचे माहिती रामवाडी येथील विभागीय कार्यालयातून देण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भातून अलिबाग येथे येण्यासाठी एकही थेट फेरी नाही. पुण्याला यायचे आणि तेथून पनवेल, पनवेल येथून अलिबाग असा गाड्या बदलत प्रवास करावा लागतो. यातच बस कनेक्‍टिव्हिटी नसल्याने प्रवाशांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जात आहे. वयोवृद्ध व्यक्तींना प्रवास नकोसा वाटतो.
अलिबाग येथे नोकरीनिमित्त आलेल्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. पनवेल येथून रात्री दहा वाजल्यानंतर अनेकवेळा एसटी नसते. मुंबई-मुरूड ही अलिबाग येथे येणारी शेवटची बस रेवदंडा पुलाच्या कामामुळे रोहामार्गे येत असल्याने पनवेल-अलिबाग या मार्गावर पहाटे पाचपर्यंत एकही बस नाही. यामुळे अनेकांना रात्र पनवेल बसस्थानकातच काढावी लागते. याचा गांभीर्याने विचार करून अलिबाग आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अमित कंटक यांनी केली आहे.

रायगड जिल्ह्यात ज्या नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत, त्या गाड्या विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मार्गावर चालवल्या जात आहेत. महामंडळाकडे एसटी गाड्या आहेत, परंतु कर्मचारीच नाहीत. लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी चार कर्मचारी लागतात. परंतु कर्मचारी या मार्गावर जाण्यास इच्छुक नसतात, त्यामुळे लांबपल्ल्याच्या फेऱ्या सुरू न करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
- दीपक गोडे, वाहतूक नियंत्रक, रामवाडी-पेण

बंद असलेल्या फेऱ्या
अलिबाग - शेगाव (रातराणी)
अलिबाग - तुळजापूर
अलिबाग - गाणगापूर
अलिबाग - गोंदवले
मुरूड - लातूर
मुरूड - छत्रपती संभाजी नगर
सासवणे - बोरिवली
आग्राव - बोरिवली
रेवस - मुंबई
रेवदंडा - कल्याण
सांबरी- मुंबई
सांबरी - परळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT