मुंबई

मृगगडाने घेतला मोकळा श्वास

CD

पाली, ता. २६ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील भेलीव गावात असलेल्या मृगगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे नुकतीच श्रमदान व संवर्धन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अनेक वास्तूंची साफसफाई करण्यात आली. तसेच पाण्याचे टाके मोकळे केले गेले.
काही महिन्यांपासून गडावरील मोठे दगडी बांधीव टाके मोकळे करण्यात आले आहेत. त्या टाक्यांमध्ये असलेले सर्व दगड या मोहिमेत बाहेर काढण्यात आले. याच टाक्यांत जाणाऱ्या बंद केलेल्या पायऱ्यांच्या खालच्या भागातील तीन ते चार फूट गाळ काढण्यात आला. यामुळे पायऱ्या मोकळ्या झाल्या आहेत. गडावरील विस्कळित भिंतीचे दगड व्यवस्थित रचून ठेवण्यात आले. त्याचबरोबर सदरेच्या परिसरातील आणि वाड्यांच्या अवशेषावरील गवत काढून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत पुरुष व महिला मिळून एकूण २६ दुर्गवीरांनी सहभाग नोंदवला. जवळपास १० वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठान मृगगडावर श्रमदान व संवर्धन मोहीम राबवत आहे.

मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
गडावर अजून अनेक वास्तु संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. या कार्यात गरज आहे ती तरुण हातांची. या शिवकार्यात व श्रमदान मोहिमेत सहभागी होण्यासाठी या क्रमांकावर ९९३०१५४३३३, ८८३०२९२२०३ संपर्क करण्याचे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

दुर्गवीर प्रतिष्ठान सोबत जोडलो गेल्यापासून या मृगगडाशी एक वेगळी नाळ जोडली गेली आहे. बांधीव टाक्यावर मागील बऱ्याच मोहिमेत सहभागी झालो आहे. आज त्या टाक्या पूर्णपणे मोकळ्या झाल्या आहेत. त्यामध्ये पाणी साचताना पाहून मेहनतीचे सार्थ झाल्याचे आम्हा दुर्गवीरांना वाटत आहे.
- नीलेश वाघमारे, सदस्य, दुर्गवीर प्रतिष्ठान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT