मुंबई

Alibaug: देशाच्या जडणघडणीत बँकांचे योगदान महत्त्वाचे, पारदर्शक व्यवहाराला प्राधान्य

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : देशातील ग्रामीण आणि शहरी भागांना एकत्र जोडण्याचे महत्त्वाचे कार्य बँकांच्या सहकार्यामुळे झाले आहे. त्यामुळे देशातील बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी, आपणही देशसेवेचा एक महत्त्वाचा भाग असल्याचा अभिमान बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रदीप अपसुंदे यांनी केले.


नाबार्ड आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, मुख्य व्यवस्‍थापक मंगेश ठाकूर, महेंद्र माळी, अजित भगत, बँकेचे विभागीय अधिकारी भरत पाटील, संजीव देशमुख आदी उपस्थित होते.


नाबार्डच्या विविध योजना आणि देशामधील त्‍यांची व्याप्ती यावर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँकेचे बहुसंख्य कर्मचारी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्‍ठ व्यवस्‍थापक संदीप जगे तर आभार बँकेचे विभागीय अधिकारी संजय देशमुख यांनी मानले.

पारदर्शक व्यवहाराला प्राधान्य

ग्रामीण भारताच्या विकासाचा प्रयत्न नाबार्डच्या वतीने नेहमीच करण्यात आला असून नाबार्डचा प्रत्येक कार्यक्रम आणि योजना ही देशातील नागरिकांना सदैव उपयुक्त ठरली आहे. सहकारी संस्थांना अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी तत्काळ करणे, आपली सामूहिक जबाबदारी असल्‍याचे अपसुंदे यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT