मुंबई

सुभेकर कुटुंबीयांकडून मरणोत्तर कर्मकांडांना फाटा

CD

सुभेकर कुटुंबीयांकडून मरणोत्तर कर्मकांडांना फाटा
कर्करोगाने पत्‍नीचा मृत्‍यू; नेत्रदान करून जपली सामाजिक बांधिलकी
पाली, ता. ६ (वार्ताहर) ः नागोठणे येथील महाराष्ट्र अंनिसचे रायगड जिल्हा अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य विवेक सुभेकर यांच्या पत्नी श्वेता सुभेकर (वय ५४) यांचे बुधवारी (ता.३) दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्याचबरोबर मरणोत्तर पारंपरिक चालीरिती व कर्मकांड करण्यात आले नाही. शिवाय दशक्रिया व उत्तरकार्यदेखील केले जाणार नसल्‍याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.
श्वेता सुभेकर या महाराष्ट अंनिसच्या कार्यकर्त्या व लायन्स क्लबच्या सदस्य होत्या. दोन्ही संघटनांच्या कामात त्या हिरहिरीने सहभागी असत. पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. याशिवाय त्या व्यवसाय व जोडीला संसारदेखील उत्तम प्रकारे सांभाळत होत्या. मागील महिन्यात त्यांना कर्करोगाचे निदान झाले. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती विवेक सुभेकर यांनी लागलीच श्वेता यांचे मरणोत्तर नेत्रदान केले. हे डोळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी पडणार आहेत. श्वेता यांचे मरणोत्तर अवयव व देहदान करायचे होते. मात्र संपूर्ण शरीरात कर्करोग ग्रासल्याने अवयव व देहदान करता आले नाही. श्वेता यांचे मरणोत्तर पारंपरिक चालीरिती व कर्मकांड करण्यात आले नाही. तसेच मरणोत्तर कोणत्याही दशक्रिया किंवा बाराव्याचा विधी सुद्धा करण्यात येणार नसल्‍याचे सांगण्यात येत आहे. विवेक सुभेकर यांनी पुरोगामी पाऊल उचलत त्यांच्या वडिलांच्या मृत्यनंतर देखील कोणतीच कर्मकांड केली नव्हती. अनेकांनी त्यांना याबाबत विरोध केला मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आणि आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी अशाच प्रकारचे पुरोगामी पाऊल उचलले. पुरोगामी संकल्पनांना कृतिशील रूप देत सुभेकर कुटुंबीयांनी मोठी हिंमत दाखवली आहे. व समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
.......................
मरणानंतर काहीही शिल्लक राहत नाही. आत्मा वैगरे सर्व थोतांड आहे. आपल्या शरीरातील अवयव गरजूंच्या कामी येतात. वैद्यकीय विद्यार्थी व संशोधनासाठी उपयोगी ठरतात. ही एक सामाजिक बांधिलकी आहे. याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा. कर्मकांडावर होणारा खर्च व वेळ सत्कामी लावावा.
विवेक सुभेकर, अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT