मुंबई

मोकाट गुरांना उकिरड्याचा आधार

CD

मोकाट गुरांना उकिरड्याचा आधार
आरोग्य धोक्यात, वाढता उष्मा व चाऱ्याच्या अभावामुळे फरफट
पाली, ता. ३० (वार्ताहर) : उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचादेखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न व पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्‍यामुळे मोकाट गुरे शहरातील डम्पिंग ग्राऊंड व उकिरड्यावरील पदार्थ खात आहेत. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय स्वच्छतेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
येथील डम्पिंग ग्राऊंडवर तसेच जुने पोलिस स्थानक, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर नगर या ठिकाणी उकिरड्यावर मोकाट गुरांची गर्दी दिसून येत आहे. येथे टाकलेला कचरा गुरांकडून अस्ताव्यस्त करण्यात येतो. त्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. बऱ्याचवेळा टाकून दिलेले पदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी, गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिक जात आहे. शिवाय प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्नपदार्थ खाऊन जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होताना दिसून येतो. त्यांची पचनशक्ती मंदावते, अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा कमी होते. अशक्तपणा येतो. डम्पिंग ग्राऊंड व उकिरड्यावरील कचऱ्यात धातू तसेच अणकुचीदार वस्तू उदा. घरगुती वापराची सुई, इंजेक्शनच्या सुया आदी घटक असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्ननलिकेला इजा पोहचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते, त्यामुळे गुरांना मृत्‍यू येतो. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचादेखील मृत्यू होत आहे.
...........................
उष्म्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरेपालक यांनी आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडू नयेत. शासनाने मोकाट गुरांच्या चाऱ्या-पाण्याची व्यवस्था केली पाहिजे किंवा पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत.
-प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्ष, पाली नगर पंचायत.
.......................
फोटो ओळ : पाली : उकिरड्यावर तसेच कचराकुंडीमधील कचरा खाणारी मोकाट गुरे. (छायाचित्र : अमित गवळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT