मुंबई

रायगडमध्ये जनजीवन विस्कळित

CD

रायगडमध्ये जनजीवन विस्कळित
वीटभट्टी, आंबा बागायतदार, उन्हाळी भातपिकाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : रायगडमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह काही भागात पाऊस पडला. कर्जत, खालापूर, पनवेल, उरण या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. याचा मतदानावरही परिणाम झाला. त्यातच पेण, सुधागड, मुरूड, रोहा आणि काही प्रमाणात अलिबाग तालुक्यात पाऊस झाला. याच दरम्यान समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला होता. यामुळे सर्वत्र वीजपुरवठा खंडित झाला होता. यावेळी मोबाईल सेवाही विस्कळित झाली.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झालेली नसल्याने विजेचे खांब, मोबाईल टॉवर नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. सायंकाळच्या दरम्यान पावसामुळे सर्वत्र काळोख पसरला. त्यामुळे कोणत्या ठिकाणी झाडे, घरे कोसळली आहेत, याची माहिती घेण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अडचणी येत आहेत. मोबाईल सेवा सायंकाळी सातच्या सुमारास पूर्वपदावर आली. या वादळी पावसाने साखर-आक्षी, बोर्ली, जीवना बंदरात नांगरून ठेवलेल्या नौकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, पण यास प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. या वादळी पावसाचा सर्वात जास्त फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. रोहा तालुक्यात उन्हाळी भातपिकाचे नुकसान झाल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी दिली.

खालापूर, कर्जत तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचेही नुकसान झाले. साधारण अर्धा-एक तास वादळी वाऱ्याचा प्रभाव होता, याच दरम्यान सर्वत्र काळोख पसरला होता. याचा परिणाम वाहतुकीवर फारसा झाला नाही. मात्र, ही सर्व परिस्थिती मान्सूनपूर्व नैसर्गिक आपत्तीची तयारी करणाऱ्या प्रशासनाची परीक्षा घेणारी ठरली. पुढील दोन दिवस विजांच्या कडकडासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.


..
वादळी पावसाची स्थिती अचानक निर्माण झाली. भारतीय हवामान विभागाकडून याचा इशारा येईपर्यंत सायंकाळचे पाच वाजले होते. या नैसर्गिक परिस्थितीची कल्पना तत्काळ प्रतिसाद गटांना देण्यात आली होती. रायगड जिल्ह्यात या पावसाने जास्त नुकसान झालेले नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT