मुंबई

खोपोलीत मध्यरात्री पर्यंत बत्ती गुल , नागरिक रस्त्याव

CD

शटडाउननंतर मध्यरात्रीपर्यंत बत्ती गुल
खोपोलीतील नागरिक हैराण

खोपोली, ता. २९ (बातमीदार) ः देखभाल-दुरुस्‍तीसाठी मंगळवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. संध्याकाळी सहा वाजता पुरवठा सुरळीत झाल्यावर काही मिनिटांत पुन्हा वीज गायब झाली, ती मध्यरात्रीपर्यंत खंडित होती. एकीकडे प्रचंड उकाडा, त्‍यात बत्ती गुल झाल्‍याने नागरिक बेजार झाले होते. त्‍यात डासांची भुणभूण सुरू असल्‍याने अनेकांना जागरण करावे लागले.
खोपोली शहरात आठवड्यातून एक दिवस, मंगळवारी देखभाल-दुरुस्‍तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. संध्याकाळी अवघ्‍या काही मिनिटांसाठी सुरू झालेला पुरवठा पुन्हा मध्यरात्रीपर्यंत खंडित होता. हायको कंपनीजवळ मुख्य वीजवाहिनी तुटल्‍याने व दुरुस्तीसाठी तीन-चार तासांचा अवधी लागल्‍याने नागरिक घामाघूम झाले होते.

...............

महावितरणच्या खांबाची दुरवस्‍था
खालापूर, ता. २९ (बातमीदार)ः अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे मध्यंतरी खालापूरमध्ये अनेक ठिकाणी घरांचे पत्रे तसेच झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. महावितरणालाही वादळाचा फटका बसला असला असून काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्‍या होत्‍या. तर काही ठिकाणी दुरवस्‍थेतील वीज खांब वाकल्‍याच्या घटना घडल्‍या.
खालापूरहून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी असलेल्या जोडरस्त्याजवळ असलेला वीज खांब निम्‍म्‍याहून अधिक वाकला आहे. या खांबावरून रस्त्याच्या पलीकडे वीजवाहिन्यांची जोडणी करण्यात आली आहे. खांब वाकल्यामुळे तारांची लोंबकळत आहेत. वीज प्रवाह सुरू असलेल्या वाहिन्या अथवा खांब कोसळल्यास, मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे महावितरणाने तातडीने खांब बदलावा, अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.

द्रुतगती मार्गाला जोडरस्‍ता असल्‍याने या मार्गावरून २४ तास वाहतूक सुरू असते. खांब कोसळण्याच्या स्थितीत असून त्याला किमान तात्पुरता टेकू लावण्याची गरज आहे. याबाबत महावितरण अधिकाऱ्याने माहिती दिली असून त्‍यांनी वाकलेला खांब त्‍वरित बदलणार असल्‍याचे सांगितले आहे.
- भाग्यश्री शिंदे, रस्ता सुरक्षा प्रमुख, दिलासा फाउंडेशन, खालापूर

खालापूर ः वाहतुकीच्या मार्गालगतचा विद्युत खांब धोकादायक अवस्थेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT