मुंबई

शिवजयघोषाने दुमदुमला रायगड

CD

शिवजयघोषाने दुमदुमला रायगड
ढोल-ताशांचा गजर; शाहिरी पोवाडे, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके

महाड, ता. ६ (बातमीदार) : डफावर पडणारी थाप, संबळ वाद्याचा ठेका आणि अंगावर रोमांच उभे करणाऱ्या पहाडी आवाजातील शाहिरी पोवाडे, होळीच्या माळावर रंगणारे मर्दानी खेळ आणि ढोल-ताशांच्या गजरात मावळ्यांचा जयघोष अशा उत्साही वातावरणामध्ये मंगळवारी रायगड किल्‍ल्‍यावर तारखेप्रमाणे शिवराज्‍याभिषेक दिनाचा सोहळा रंगला होता.

सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषेत लाखोंच्या संख्येने मावळे गडावर आले होते. संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे, संयोगिता राजे यांच्यासह शिवप्रेमी सकाळी पायी गडावर पोहोचले. ऊन-पावसाची तमा न बाळगता, शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रायगडावर सादर होणाऱ्या प्रत्‍येक कार्यक्रमात हाच उत्‍साह ओसंडून वाहत होता.
सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व यांच्या पत्नी यांच्या हस्ते गडपूजन झाले आणि गडदेवता शिरकाईचा गोंधळ पार पडला. गडावर शाहिरी रात्र दुमदुमून गेली. मंगळवारी सकाळपासूनच राजसभेवर रंगणारा शाहिरी कार्यक्रम उपस्थित मावळ्यांच्या अंगावर रोमांच उभे करत होता. विजय कांबळे तसेच इतर अनेक शाहिरांनी उत्तम पोवाडे सादर केले. ‘अंधार झाला फार, एक दिवा पाहिजे, या मातीला जिजाऊचा शिवा पाहिजे’ या पोवाड्यावर शिवप्रेमी अक्षरशः मंत्रमुग्‍ध होऊन नाचू लागले. महाराष्ट्र गीत, शेतकरी गीते, उंबरखंडीचे युद्ध, शिवरायांचे पराक्रम अशा एकेक गाथा पोवाड्यातून उलगडत होत्या. पहाडी आवाजातील या पोवाड्यांनी रायगडावर पुन्हा शिवकाल अनुभवास मिळाला.
होळीच्या माळावर रंगलेल्‍या मर्दानी खेळाची यात आणखी भर पडली. शिवकालीन युद्धकला पाहताना असंख्य शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ढाल तलवारीचा खणखणाट, भाले, गरागरा फिरणारे दांडपट्टे, पाठीवर छोट्या बाळाला बांधून युद्ध करणारी आई अशा तत्कालीन युद्धकला पाहून वेगळीच अनुभूती मिळत होती. ढोल-ताशा पथकाने किल्‍ला दणाणून सोडला.

उत्‍साह वाखाणण्याजोगा
नगर, कोल्हापूर, पुणे अशा विविध भागांतून ढोल-ताशा पथके रायगडावर दाखल झाली होती. प्रत्‍येक पथकाने होळीच्या माळावर आपली कला साजरी केली. ऐतिहासिक पेहराव केलेले मावळे, पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलावर्ग तसेच बच्चे कंपनीचा उत्‍साह वाखाणण्याजोगा होता.

शिवप्रेमींची तोबा गर्दी
भगवे ध्वज खांद्यावर घेऊन शिवरायांचा जयघोष करीत रायगडाच्या पायऱ्या चढताना शिवराज्याभिषेक दिनाच्या उत्‍सवात सहभागी होता आल्‍याचा अभिमान प्रत्‍येकाच्याच चेहऱ्यावर झळकत होता. गड चढताना अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, गडावरील गर्दीची पर्वा न करता केवळ शिवरायांचा राज्याभिषेक दिन सोहळा याची डोळा पाहण्याकरिता शिवप्रेमींनी गडावर तोबा गर्दी केली होती.

महाड ः रायगडावरील शाहिरी कार्यक्रम युद्धकला सादर करण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात गड दुमदुमला.
....................

शिवप्रेमींच्या सेवेसाठी जिल्हा परिषद
अलिबाग (बातमीदार) ः किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यानिमित्त १ जूनपासून विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज मोठ्या संख्येने शिवप्रेमी गडावर दाखल झाल्‍याने पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या दृष्टीने कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या होत्‍या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्रशासनाने शिवप्रेमींची काळजी घेतली.
गडावर तसेच पायथ्याशी १७ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. त्‍यांना पुरेसा औषधसाठा पुरवण्यात आला होता. याशिवाय २० रुग्णवाहिका ठिकठिकाणी तयार होत्‍या. शिवप्रेमींसाठी ३८० शौचालये व १०० स्नानगृहांची सोय केली होती. गडावर, पायथ्याशी, पायऱ्यांवर ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्‍या होत्‍या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT