महाड, ता. २१ (बातमीदार) ः विठू माऊली आणि वारकऱ्यांचे नाते अतूट असून पंढरपूरला जाण्यासाठी विठूभक्त आसुसलेले असतात. रायगड जिल्ह्यातील सुमारे सहा हजार वारकरी २३ नोव्हेंबरला येणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. आपल्या गावापासून विठ्ठल रखुमाई नमाचा जयजयकार करत पाऊले चालती पंढरीची वाट अशी वारकर्यांची पायी वारी पंढरपूरला पोहचणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन दिवशी पंढरपूरला वारकऱ्यांची वारी होत असते परंतु कोकणामध्ये शेतीची कामे असल्याने आषाढी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे कोकणातून कार्तिकी एकादशीला पंढरीला जाणाऱ्यांची गर्दी मोठी असते. या वर्षी २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी असून जिल्ह्यातून देखील सुमारे सहा हजार वारकरी पंढरपूरला रवाना होत आहेत. आपापल्या गावातून वाऱ्या महामार्गावरून पायी निघाल्या आहेत.
महाड तालुक्यातील विन्हेरे, आंबवडे ,शिरवली, जिल्ह्यातील नडवली खांब कोलाड, इंदापूर,तळा, माणगाव ,श्रीवर्धन म्हसळा, गांधारपाले, वहूर, वरंध, पोलादपूर या भागातून वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात. तालुक्यातील गांधारपाले येथील ९२ वर्षांची अखंड परंपरा असलेली पायी वारी देखील पंढरपूर कडे रवाना झाली आहे. पुरुष वारकरी टाळमृदंग व माऊलीच्या जयघोषात तर कधी भजन करत मार्गस्थ होत आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेतलेल्या महिलावर्ग देखील दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. गांधारपाले गावातील वारी ९२ वर्षांपासून अखंडित सुरू आहे. काही वर्षांपासून वारकऱ्यांच्या आग्रहानुसार आता ही वारी कोलाड येथून सुरू होते. महामार्गावरून सर्व वारकऱ्यांना एकत्रित करत बारा दिवसांनी ही दिंडी पंढरपुरी मुक्कामी जाते. फौजी आंबवडे येथून हभप हनुमान शेलार महाराज यांच्या नेतृत्वाखालीही वारी रवाना झाली आहे.
नडवली खांब येथील वारीची ही मोठी परंपरा आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने गाड्यांची सोय केली आहे. जिल्ह्यातून वारकऱ्यांच्या मागणीप्रमाणे गाड्या पंढरपूरसाठी सोडल्या जातात. याशिवाय खासगी वाहनानेही वारकरी पंढरपूरला जातात.
फोटो -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.