Crime News sakal
मुंबई

Crime News: एटीएम फोडण्याचा केला प्रयत्न; दोघांना अटक

CD

महाड, ता. १० (बातमीदार) : शहरातील तांबट आळीत भरवस्तीत असलेले दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना महाड शहर पोलिसांनी रात्री अटक केली. काही दिवसांपासून शहरांमध्ये चोरांनी उच्छाद मांडला आहे.


शनिवारी (ता.९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या मुख्य शाखा इमारतीतील एटीएम फोडण्याचा प्रयत्‍न एक चोरटा करीत असल्‍याचे सीसी टीव्हीमध्ये कैद झाले. त्याने एटीएममधील यंत्रणा पूर्णपणे वाकवून तोडफोड केली. यंत्रणेची तोडफोड झाल्यानंतर बँकेशी असलेला त्याचा सिग्नल तुटल्याने बँक कर्मचाऱ्यांना ही बाब त्वरित लक्षात आली. त्यांनी याबाबत तातडीने एटीएम केंद्राची संपर्क साधला.

तत्पूर्वी एटीएम फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्याने चोरट्याने पळ काढला. याबाबत बँकेचे मुख्य व्यवस्थापक संतोष यादव यांनी त्‍वरित महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस हवालदार निकेत वार्डे व शिपाई रामसेवक कांदे यांनी महाडमध्ये चोरांचा शोध सुरू केला असता, तळामध्ये रात्री दहाच्या सुमारास एका दुकानाजवळ दोन संशयित व्यक्ती वावरत असल्याचे आढळले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असता दुसरा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

परंतु स्‍थानिक युवकांनी तत्परता दाखवत दुसऱ्याला पोलिसांच्या ताब्‍यात दिले. दोघांपैकी एकाचे नाव शराफत अजमत खान (रा.भरतपूर राजस्थान) असून दुसऱ्या चोरट्याचे नाव गुलाब इलियास खान (रा. मुबारकपूर हरियाना) आहे. दोघांकडून पोलिसांनी विविध बँकांची दहा ते बारा एटीएम कार्ड जप्त केली आहेत. या दोघांवर मुंबई व अन्य परिसरात एटीएम फोडीचे गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


चोरीच्या घटना सीसी टीव्हीत कैद


महाडमध्ये महिन्याभरात लहान मोठ्या आठ ते दहा चोरीच्या घटना घडल्‍या आहेत. शहरात चोरट्यांचा वावर वाढल्‍याचे अनेकदा सीसी टीव्हीत कैद झालेल्‍या चित्रणावरून दिसते. याबाबत शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशाराही दिला होता, परंतु तरीही शहरातील चोरीचे प्रकार थांबले नसल्याचे एटीएम फोडण्याच्या घटनेवरून समोर येत आहे. तांबट आळीसारख्या भरवस्तीमध्ये सायंकाळी झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट असून पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT