मुंबई

लाडवलीचा पर्यायी मार्ग पाण्याखाली

CD

महाड, ता. ८ (बातमीदार) : मुसळधार पावसामुळे महाड-रायगड महामार्गावरील रखडलेल्या लाडवली पुलाजवळच्या पर्यायी मार्गावरून पाणी गेल्याने सोमवारी रायगड मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली, तर बिरवाडी येथील रस्‍तेही पाण्याखाली गेले होते. मुसळधार पावसाने सावित्री नदीची पातळी वाढल्‍याने प्रशासन सतर्क झाले आहे.
रायगड परिसर तसेच बिरवाडी परिसरातही दोन दिवसांपासून पावसाने जोर कायम आहे. शिरवाड येथील काळ नदीची पातळी वाढल्‍याने महाड ते बिरवाडी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती.
अतिवृष्टीमुळे महाड-रायगड मार्गावर असलेल्या लाडवली पुलाच्या पर्यायी मार्गावरून नदीचे पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. लाडवलीतील जुना पूल तोडून त्‍या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे. या पुलावरून जवळपास ४० गावांतील नागरिकांची वर्दळ सुरू असते. त्‍यामुळे नवीन पूल तयार होईपर्यंत पुलालगत पर्याय मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु पुलाचे काम रेंगाळल्याने पावसाळ्यात नदीच्या पातळीत वाढ झाल्याने पर्यायी मार्गावरून पाणी वाहू लागल्‍याने रायगड व परिसरातील २५ गावांची वाहतूक विस्कळित झाली. या वाहनांना आचळोलीमार्गे अरुंद रस्त्यावरून प्रवास करावा लागला. सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली असून सायंकाळी सात वाजेपर्यंत ५.४५ मीटर होती. पातळी वाढल्‍याने पुराची धोका लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे.

महाड ः लाडवलीचा पर्याय मार्ग पाण्याखाली गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT