मुंबई

महाड शहरात शिरले पुराचे पाणी, रायगड मार्गावर कोसळली दरड

CD

कोसळधारेचा तडाखा

महाड शहरात पुराचे पाणी; रायगड मार्गावर कोसळली दरड

महाड, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यामध्ये पावसाने कहर केला असून सावित्री, गांधारी व काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने गुरुवारी सकाळी महाड शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्‍यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांनी आपले सामान व दुकानातील वस्‍तू सुरक्षित स्थळी हलवले. गांधारी पूल, दादली पूल व दस्तुरी मार्ग बंद झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली. महाड तालुक्यातही घर कोसळणे, पूल कोसळणे तसेच किल्‍ले रायगड मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. पावसाचा जोर वाढल्‍याने नगरपालिका प्रशासन व एनडीआरएफ सज्ज झाले आहे.
महाड तालुक्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळी महाड शहरात पुराचे पाणी शिरले. दुपारपर्यंत सावित्री नदीची धोका पातळी साडेसात मीटर होती. नदीकिनारी असणाऱ्या भोईघाट, सुकट गल्ली, तसेच महाड बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुराचे पाणी शहरात शिरताच व्यापाऱ्यांनी आपल्या सामानांची व दुकानातील मालाची बांधाबांध सुरू केली. नागरिकांनीही घरातील सामान सुरक्षित स्थळी हलवले.
महाड शहरातून अन्य भागांना जोडणारे गांधारी पूल व दादली पूल पाण्याखाली गेले; तसेच दस्तुरी मार्गही पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. महाड-रायगड मार्गावर पाचाडजवळ दरड कोसळल्याने रायगड किल्‍ल्‍याकडे जाणारा मार्ग ठप्प झाला असून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तालुक्यातील कसबे शिवतर सह्याद्री वाडी या रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे तुटल्याने ग्रामस्‍थांची गैरसोय झाली. त्‍यांना दूर शिवतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. तालुक्यातील शिरवली येथील ईमदार पेवेकर यांचे घर पावसामुळे कोसळले. दादली येथील काशिराम गायकवाड यांच्या घराच्या पत्रावर मातीचा ओसरा आला. यात घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर तुडील येथील सुरेंद्र पाटणे यांच्या घरावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. रायगड रस्ता, वाळण, बिरवाडी या भागामध्ये पावसाचा जोर सायंकाळपर्यंत कायम होता.

प्रशासन सज्ज
महाड शहरातील पुराचे पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपालिकेकडून मदतीसाठी बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांना पुराची पातळी एसएमएसद्वारे कळवली जात असून भोंगेदेखील वाजवले जात आहेत. एनडीआरएफ पथकही तैनात आहे. शहरामध्ये पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांच्या बचावासाठी राष्ट्रीय स्मारक, वीरेश्वर मंदिर, रमाई विहार शाळा क्रमांक पाच व नवीन पोलिस वसाहत या ठिकाणी बचाव पथके बोट साहित्यासह तैनात करण्यात आली आहेत. या पथकातील सर्वांचे मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. आपत्कालीन पूरपरिस्थिती महाड शहर आपत्ती नियंत्रण कक्ष मो. ७९७२९ ३११६१, दूरध्वनी ०२१४५ -२२२१४३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाड ः

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT