मुंबई

अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

CD

मुंबई, ता. ३ : महावितरणच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदाणी इलेक्ट्रीकल्सने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज (ता. ३) मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या काळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे.
वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली आहे. हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत, त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---
उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक
संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उद्या (ता. ४) दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ती भिंत तोडणारच.. ५०% आरक्षणावरुन राहुल गांधींचा घणाघात, सविधान सन्मान संमेलनात केला हल्लाबोल

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, आता भारतीय इंजिनीअर्सच्या नोकऱ्या जाणार का?

Ranji Trophy 2024: ६०००+ धावा अन् ४००+ विकेट्स; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय, पण टीम इंडियात संधी नाही

SCROLL FOR NEXT