मुंबई

जलाशयातील ‘ओव्हरफ्लो’ पाण्याला ब्रेक!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : मुंबईकरांना मुबलक पाणी देण्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधून ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी वापरात आणण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. पावसाळ्यात जलाशय ‘ओव्हरफ्लो’ झाल्यामुळे दिवसाला लाखो लिटर पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी वाचवून ते मुंबईत आणण्याच्या आराखड्यावर लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. विहार तलावातून ओव्हरफ्लो होणारे पाणी भांडुप ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणण्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात १२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पावसाळ्यात विहार जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर मिठी नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी समुद्रात जाते. ओव्हरफ्लो झाल्यानंतर किती पाणी वाया गेले याचा अंदाज लावणे अवघड असते. हे शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी अडवता आले तर मुंबईकरांना अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर वाया जाणारे पाणी अडवण्यासाठी पालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार भांडुप कॉम्प्लेक्स ते विहार जलाशयापर्यंत एक किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.

विहार जलाशयाजवळ इनटेक वेल बांधण्यात येणार असून, पाईपलाईनचे जोडणी विहार तलावासह इनटेक वेललाही दिली जाणार आहे. जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर भांडुप शुद्धिकरण प्रकल्पात इनटेकवेलमधून पाईपद्वारे आणि विहार तलावातून ओव्हरफ्लो होण्यापूर्वी पाणी आणले जाऊ शकते. गुरुत्वाकर्षणाद्वारे भांडुप संकुलात पाणी आणणे शक्य नाही. त्यामुळे विहार जलाशयाजवळ पंम्पिंग स्टेशन बांधले जाणार आहे. त्यामुळे इनटेक वेलमधून पाणी उपसून भांडुप कॉम्प्लेक्समध्ये आणण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

टंचाईवर मात
मुंबई शहराला पालिकेच्या सात जलाशयांतून पाणीपुरवठा होतो. धरणांमधील पाण्याची स्थिती ही त्या-त्या पावसाळ्यातील पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यानुसार कमी अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होतो. मुबलक पाऊस झाल्यानंतर पाणीपुरावठ्याची चिंता नसते; मात्र एखाद्या वर्षी पाऊस कमी झाल्यास नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिका ‘पाणी बचती’च्या योजनेवर काम करत आहे.

लवकरच निविदा
१) दररोज २०० एमएलडी पाणी आणण्याची योजना आहे.
२) पाणी भांडुप ट्रीटमेंट प्लांटमध्ये शुद्ध करून पुरवले जाणार
३) योजनेसाठी पालिका लवकरच निविदा काढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT