मुंबई

आठपैकी एक माणूस लठ्ठ - आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईतील प्रत्येक आठवी व्यक्ती लठ्ठ असल्याचे आढळून आले आहे. या लठ्ठपणामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. महापालिका आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त स्टेप सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. लठ्ठपणाचे कारण फिटनेसकडे लक्ष न देणे आणि कमी आहार घेणे हे असे असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील असंसर्गजन्य आजारांचे पुरावे जाणून घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण जागतिक आरोग्य संघटना आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या सर्वेक्षणात इतर आजारांसोबतच मुंबईकरांना लठ्ठपणाचाही त्रास होत असल्याचे समोर येत आहे.
...
१५ टक्के महिला लठ्ठ
सर्वेक्षणात समाविष्ट ५,१९९ सहभागींपैकी प्रत्येक आठवी व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणानुसार पुरुषांपेक्षा महिला अधिक लठ्ठ असल्याचे आढळून आले. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ टक्के महिला लठ्ठ आहेत, तर पुरुषांची संख्या ९ टक्के आहे.
...
मोठे आव्हान
लठ्ठपणा हे सार्वजनिक आरोग्याच्या सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून वेगाने उदयास येत आहे. याचा थेट संबंध मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग तसेच वंध्यत्वाच्या समस्यांसारख्या जोखीम घटकांशी आहे. पालिकेच्या संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, नागरिकांनी निरोगी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पौष्टिक आहारासोबतच फिटनेसकडेही लक्ष दिले पाहिजे.
...
राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार...
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, २०१९ आणि २०२१ मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या फेरीनुसार, देशातील १६ पैकी एक महिला आणि २५ पैकी एक पुरुष लठ्ठ आहे. एनएफएचएस ५ व्या फेरीत असेही आढळून आले की १५ ते ४९ वयोगटातील सुमारे ६.४ टक्के महिला आणि ४ टक्के पुरुष लठ्ठ आहेत.
...
तज्ज्ञ काय म्हणतात?
हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. पवनकुमार पीपडा म्हणाले की, दररोज ओपीडीमध्ये हृदयाशी संबंधित आजारांसाठी येणाऱ्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण लठ्ठपणाने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यांचा बॉडी मास इंडेक्स निर्धारित मानकांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. अशा रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT