मुंबई

एमबीए प्रवेशाची तात्पुरती प्रवेश यादी तयार

CD

एमबीए प्रवेशाची तात्पुरती प्रवेश यादी तयार
मुंबई, ता. २६ : राज्यातील एमबीए आणि एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची ५० हजार ६३३ विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी राज्य सीईटी सेलने तयार केली आहे. अंतिम यादी गुरुवारी २७ जुलै रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
मागील वर्षी राज्यातील ३२८ संस्थांमध्ये ४४ हजार ४७७ जागा होत्या. एमबीए अभ्यासक्रमांसाठी या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी ४९ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३६ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते; तर ७ हजार ७३० जागा रिक्त राहिल्या होत्या. रिक्त जागा राहण्याचे प्रमाण हे १७ टक्के इतके होते. यंदा जागांत फारशी वाढ करण्यात आलेली नाही. या जागांसाठी ५० हजार ६३३ विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. यापैकी त्रुटी आणि हरकती पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होणार आहे. या प्रवेशाची २७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना २८ ते ३० जुलैदरम्यान संस्था विकल्प भरावे लागणार आहेत. यानंतर १ ऑगस्ट रोजी पहिली कॅप प्रवेश फेरी होणार आहे. त्यानंतर २ ते ४ ऑगस्ट विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. ५ ऑगस्टला दुसरी कॅप फेरी जाहीर होणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT